मराठी मालिकाविश्वात पहिल्यांदाच कॉर्डेलिया क्रूझवर झालं 'नवरी मिळे हिटलरला'चं शूट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 06:30 PM2024-09-27T18:30:53+5:302024-09-27T18:31:24+5:30

Navari Mile Hitlerla : 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतील खूप महत्वाच्या टप्प्याचं चित्रीकरण कॉर्डेलिया क्रूझवर पार पडलं.

For the first time in the world of Marathi serials, the shoot of 'Navari Mile Hitlerla' was done on Cordelia Cruz | मराठी मालिकाविश्वात पहिल्यांदाच कॉर्डेलिया क्रूझवर झालं 'नवरी मिळे हिटलरला'चं शूट

मराठी मालिकाविश्वात पहिल्यांदाच कॉर्डेलिया क्रूझवर झालं 'नवरी मिळे हिटलरला'चं शूट

आतापर्यंत आपण पाहिलं आहे मालिकांचं शूट कुठच्या तरी समुद्र किनाऱ्यावर, हॉटेलमध्ये, किंवा कुठच्याही डेस्टिनेशनवर झाले आहे. पण यावेळी चक्क हे शूट समुद्राच्या मध्यभागी झाले आहे आणि हे सगळे घडले आहे आलिशान ‘कॉर्डेलिया क्रूझवर’. 'नवरी मिळे हिटलरला' (Navari Mile Hitlerla) मराठी टेलिव्हिजनची पहिली मालिका ठरली आहे ज्या मालिकेचं शूट क्रूझवर झालं आहे. वर मोकळं आकाश, पौर्णिमेचा चंद्र, थंडगार वारा आणि खाली निळाशार अथांग समुद्र ह्या रोमँटिक वातावरणात प्रेक्षकांची आवडती जोडी एजे आणि लीला कॉर्डेलिया क्रूझवर होती. लीला तिच्या आयुष्यातली अत्यंत महत्वाची गोष्ट एजेला या क्रूझवर सांगणार आहे. 

'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतीळ खूप महत्वाच्या टप्प्याचं चित्रीकरण या क्रूझवर पार पडलं. अथांग समुद्राला साक्षी ठेऊन लीला ने एजेला या क्रूझवर प्रपोज केलंय.  पण कहाणी मे ट्विस्ट है, लीलाच्या तीन सुना तिचं हे प्रपोजल हाणून पडण्याचा प्रयत्न करणार आहेत. हा भाग टीव्ही स्क्रीनवर पाहण्याचा अनुभव प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय असणार आहे. या सहलीसाठी क्रूजवर फक्त एजे-लीला नाही तर संपूर्ण जहागीरदार कुटुंब पोहोचलं आहे. दोन दिवसांच्या शूटिंगमध्ये, कलाकार आणि टीमने अनेक आव्हानांचा सामना केला, पण त्यांनी प्रेक्षकांना अद्भुत अनुभव मिळावा यात कुठेच कमतरता ठेवली नाही. 


वल्लरी विराजने सांगितले की, "मी पहिल्यादांच क्रूझचा अनुभव घेतला आणि क्रूजवर शूटिंगचा अनुभव तर खूपच कमाल होता. आम्ही एजे-लीलाने एक सीन शूट केला जिथे लीला एजेला प्रपोज करते. क्रूझवर शूटिंग केल्याने यामध्ये एक विशेषता जोडली गेली आहे. शूटिंग व्यतिरिक्त संपूर्ण टीमने खूप मजा केली आणि जितके एक्सप्लोअर करता आले तितके केले. आशा आहे की जितकी मज्जा आम्हाला आली हा सीन शूट करताना तितकाच आनंद प्रेक्षकांनाही लवकरच मिळेल."

Web Title: For the first time in the world of Marathi serials, the shoot of 'Navari Mile Hitlerla' was done on Cordelia Cruz

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.