Join us

अंदाज-ए- फरहान अख्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2016 3:15 AM

‘रॉकस्टार’च्या इमेजमध्ये सध्या अभिनेता फरहान अख्तर आपल्याला पाहायला मिळतोय. एकदम कूल डूडच्या लूकमधील फरहानच्या गाण्यावर सध्या तरुणाई वेडी झाली आहे.

‘रॉकस्टार’च्या इमेजमध्ये सध्या अभिनेता फरहान अख्तर आपल्याला पाहायला मिळतोय. एकदम कूल डूडच्या लूकमधील फरहानच्या गाण्यावर सध्या तरुणाई वेडी झाली आहे. ‘रॉक आॅन २’ या चित्रपटामध्ये आपल्याला फरहान हटके अंदाजात दिसणार आहे. या चित्रपटाविषयी या रॉकस्टारने ‘लोकमत सीएनएक्स’शी मारलेल्या या मनमोकळ्या गप्पा... च्‘रॉक आॅन' चित्रपटाचा सिक्वेल तब्बल आठ वर्षांनी पुन्हा नव्या रुपात येत आहे, याबदद्ल तू काय सांगशील?- गेल्या सात वर्षांमध्ये या चित्रपटातील प्रत्येक पात्राचे आयुष्य बदललेले आहे. नवीन मुलगी जियाची एंट्री या सिनेमात झाली आहे. चित्रपटाचे संगीत फार वेगळे आहे. सर्व पात्र मॅच्युअर्ड झाली आहेत आणि तिच मॅच्युरिटी सिनेमाच्या संगीतातही येण्याची गरज आहे. त्यामुळे चित्रपटातील संगीतदेखील एकदम हटके आहे. च् शिलाँगमध्ये शूटिंग करण्याचे काही खास कारण होते का?- शिलाँग रॉक म्युझिकचे कॅपिटल आॅफ इंडिया म्हणून ओळखले जाते. शिलाँग अतिशय सुंदर निसर्गरम्य ठिकाण आहे. तिथल्या लोकांनी फार आदरातिथ्याने आमचे स्वागत केले. शिलाँगमध्ये चित्रीकरण करण्याचा आमचा अनुभव अविस्मरणीय होता. च् तुला अनेक चित्रपटांसाठी पुरस्कार मिळाले आहेत, ‘रॉक आॅन’साठी राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला होता. आता काही अपेक्षा आहेत का?चित्रपट तयार करताना मी कधीच पुरस्कारांचा विचार करीत नाही. चित्रपट कधी यशस्वी होतो, तर कधी अपयशी. त्यामुळे कोणत्याही चित्रपटाच्या बाबतीत काहीही होऊ शकते. प्रत्येक दिग्दर्शक, निर्मात्याला आपला चित्रपट चालावा, प्रेक्षकांना-समीक्षकांना तो आवडावा असेच वाटत असते. त्यामुळे काम करताना कधीही पुरस्कारांचा विचार करत नाही. च्मराठी चित्रपटाची निर्मिती करण्याचा काही विचार आहे का?मराठी चित्रपट मी पाहिले आहेत. मला मराठी बोलता येत नसले, तरीही मराठी मला समजते. जर चांगल्या मराठी चित्रपटासाठी मला विचारण्यात आले, तर मी खरेच अभिनय करायला तयार आहे. फक्त त्यासाठी मला मराठी भाषा शिकावी लागेल आणि माझी ती शिकण्याची तयारी आहे. तसेच उत्तम कथा मिळाली तर मराठी चित्रपटाची निर्मितीदेखील नक्कीच करेन. च्झोयासोबत काम करतानाचा अनुभव कसा असतो?झोयासोबत काम करताना मला खरेच मजा येते. आम्ही दोघे एकमेकांना एवढे चांगले ओळखतो की, कधी कधी बोलायची ही गरज भासत नाही. आम्हाला एकमेकांचे हावभाव पाहूनच समजतो की, कोणाला काय म्हणायचे आहे. त्यामुळे झोयासोबत काम करताना, सेटवर असताना मला फारच कम्फर्टेबल वाटते.