Join us

विदेशी मालिकांचे देशी रिमेक

By admin | Published: August 24, 2015 12:10 AM

स्टार प्लसवर नुकतीच नवी मालिका ‘सुमित संभाल लेगा’चा प्रारंभ झाला आहे. ही मालिका म्हणजे ‘एव्हरीबडी लव्ह रेमेंड’ या अमेरिकन मालिकेचे हिंदी व्हर्जन असल्याचे चॅनलनेदेखील सांगितले.

स्टार प्लसवर नुकतीच नवी मालिका ‘सुमित संभाल लेगा’चा प्रारंभ झाला आहे. ही मालिका म्हणजे ‘एव्हरीबडी लव्ह रेमेंड’ या अमेरिकन मालिकेचे हिंदी व्हर्जन असल्याचे चॅनलनेदेखील सांगितले. ही मालिका निर्माण करताना आधिकारिक हक्क व मूळ मालिकेतील काही पात्रांचा देखील समावेश यात करण्यात आला आहे. सामान्य माणसांच्या ड्रॉर्इंग रुममधील इडियट बॉक्स सुरुवातीच्या काळात ‘देशी मसाला’ सर्व्ह करीत होता. खाजगी वाहिन्यांच्या शिरकावाने यात विदेशी मालिकांची छाप दिसू लागली. गेम शोपासून ते टॉक शोपर्यंत विदेशी ब्रँडिंगच्या मालिकांचा पूरच आला. वाहिन्यांसाठीची सॉफ्टवेअर प्रदाता कंपनी एंडोमॉल जवळ जगातील सर्व मोठ्या शो व मालिकांना हिंदीत रुपांतरित करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले जाते. हे अधिकार अधिक किंमतीत हिंदी वाहिन्यांना विक ले जातात. अमिताभ बच्चन यांचा ‘कौन बनेगा करोडपती’ ते ‘बिग बॉस’ व सलमानच्या ‘दस का दम’ पासून ते ‘खतरो के खिलाडी’पर्यंत ही यादी आणखी वाढत आहे. स्टार प्लसवर दाखविली जाणारी नवी मालिका एका नव्या ट्रेंडची कथा सुरू करीत आहेत. गेम शो व टॉक शोची जादू फिक्शनवर चालू शकली नाही. पहिल्यांदा झी टीव्हीने असे साहस करीत अमेरिकन मालिका ‘फ्रेण्ड’चे हिंदी रुपांतर केले होते, मात्र याला दर्शकांचा प्रतिसाद मिळाला नाही. ‘द सूट लाईफ आॅफ जॅक अ‍ॅण्ड जीनी’ चे हिंदी रुपांतर ‘द सूट लाईफ आॅफ करण अ‍ॅण्ड कबीर’ फ्लॉप झाला. सोनी टीव्हीवर दाखविली जाणारी ‘जस्सी जैसा कोई नही’ने मोना सिंगला स्टारचा दर्जा मिळवून दिला. ही मालिका ‘अग्ली बॅटी’चे हिंदी रुपातंर होते. कपील शर्माचा कॉमेडी शो एकमेव असा असल्याचा विचार करीत असाल तर ते चुकीचे आहे. ब्रिटीश टेलिव्हीजनवर प्रसारित होणाऱ्या ‘द कुमार्स अ‍ॅट न 42’ चा कॉन्सेप्ट असाच आहे. सब टीव्हीवरील हिट शो जीनी और जुजू हा देखील ‘आय ड्रिम आॅफ जॅनी’चा रिमेकच आहे.