पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यात डिजिटल इंडियाचा नारा दिला़ त्यावेळी फेसबुकच्या मार्क झुकेरबर्ग यांनी डिजिटल इंडियाला पाठिंबा देण्यासाठी प्रोफाईल पिक्चर वेगळ्या पद्धतीने तयार केले़ यामुळे खऱ्या अर्थाने लोकांना डिजिटल मीडियाचे महत्त्व कळले़ पण मराठी इंडट्रिने ग्लोबलाईज होण्यासाठी पूर्वीपासूनच डिजिटल मीडियावर लक्ष्य केंद्रीत केले आहे़ अगदी चित्रपटाच्या पदार्पणापासून ते प्रमोशन पर्यंतच्या सर्व गोष्टी सोशल मीडियावर अपडेट करण्याचे प्रमाण हे मराठीमध्ये अधिक आहे़ याचा बोलबाला डिजिटल मीडियातही जाणवत आहे़ मराठी असो की हिंदी आता चित्रपटांचे गणितच बदलले आहे, ‘शोले’पासून ते ‘सत्यापर्यंतचे पूर्वीचे हिट चित्रपट घेतले तर ते ‘माऊथ पब्लिसिटी’वर चालायचे. मात्र, आता चित्रपटांचे आर्थिक यश पहिल्या दोन ते तीन दिवसांतच ठरत असल्याने प्रदर्शनापूर्वीच त्याची धुम होणे गरजेचे असते. टिष्ट्वटर फेसबुकवरून ती करणे आता शक्य झाले आहे. मराठीतील सध्याचा कोणताही चित्रपट घ्या, त्याचे फेसबुक अकाऊंट आहे. अगदी शुटींगच्या शेड्युलींगपासून ते ‘मेकींग’पर्यंतच्या घडामोडी यावर शेअर करून आपल्या चाहत्यांना जास्तीत जास्त कनेक्ट ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. चित्रपटाची उत्सुकता वाढविली जात आहे. चित्रपटाच्या आॅफीशिअल वेबसाईटची जागा आता टिष्ट्वटरने घेतली आहे. टिष्ट्वटरचे वैशिष्ट्य म्हणजे यावरून मिळणारा प्रतिसाद. कधी कधी तर अत्यंत वास्तववादी आणि प्रसंगी कठोर काँमेंटसही होतात आणि त्यातून सुधारण्याला वाव मिळतो. ‘तू हि रे’ या चित्रपटाचे उदाहरण याबाबत देता येईल. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सुरूवातीच्या काळात तेजस्विनी पंडीतला इंट्रोड्यूस करण्यात आले. चित्रपटातील विविध गाण्यांच्या माध्यमातून तेजस्विनीचा तोपर्यंत ग्लॅमरस नसलेल्या इमेजला सातत्याने हिटसने ग्लॅमरस बनविण्यात आले. सुरूवातीच्या टप्प्यात गाणीही तिचीच होती. मात्र, एका टप्प्यावर सई ताम्हणकर ‘सईसुंदरा’ बनून आली. आणि प्रेक्षकांमध्ये नक्की दोघींच्या केमीस्ट्रीबाबत चर्चा सुरू झाली. चित्रपटात एका अर्थाने ‘कॉपीटीटर’ असणाऱ्या या दोघींची शुटींगच्या दरम्यानची मैत्री टिष्ट्वटर आणि फेसबुकवरून रसिकांच्या मनात ठसविण्यात आली.फेक अकाउंटपासून सावधानसध्या बहुतांशी कलाकार फेसबुकवर अॅक्टिव्ह झाले आहेत. पण थोडं अधिक जाणून घेतलं तर लक्षात येईल की कलाकारांची काही अकाउंट ही फेक असल्याचे दिसते. थोडक्यात एकाच कलाकाराचा डीपी असलेली पाच ते सहा अकाउंट अँक्टिव्ह असल्याचे कळते...’सेलीब्रिटीजबरोबर थेट संवाद’एक काळ असा होता की लाडक्या कलाकारांना केवळ लांबून पाहता यायचे..संवाद साधणे तर दूरचीच गोष्ट! पण सध्याच्या काळात फेसबुक आणि ट्ट्विटरने आवडत्या कलाकारांना जवळ आणण्याचे काम केले आहे. फेसबुकवर चाह्त्यांच्या फ्रेंडस रिक्वेस्ट कलाकारांनी एक्सेप्ट करण्यापासून ते चाहत्यांनी त्यांना ट्ट्विटरवर फॉलो करून त्यांच्याशी बिनधास्तपणे संवादाची देवाणघेवाण करण्याचे काम सोशल नेटवर्किंग साईटसवर सुरू आहे. आपल्या चाहत्यांच्या कमेंटसना न कंटाळता कलाकार रिप्लाय देत आहेत हे त्यातील विशेष!
मराठी चित्रपट सृष्टीत सर्वाधिक tweets करणा-या सेलीब्रिटी!
Swwapnil Joshi :15.1K
-------------------
milan.darda@lokmat.com