अॅमेझॉन प्राइम व्हिडिओने त्यांचा आगामी प्राइम ओरिजनल सीरिज 'फोर मोर शॉट्स प्लीज!'चा बहुप्रतिक्षित ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. रंगिता प्रीतिश नंदी रचित या सीरिजची निर्मिती प्रितिश नंदी कम्युनिकेशन्स आणि दिग्दर्शन अनु मेननने केले आहे. नवीन प्राइम ओरिजनल महिलांच्या अतुट मैत्रीवर प्रकाश टाकते. या महिला शहरी भारतातील तरुण महिलांच्या जीवनाला सादर करतात. तसेच आधुनिक काळात महिलांच्या बदलत्या भूमिकांसह महिलांना बदलत असलेल्या समाजातील सामना कराव्या लागणाऱ्या रुढी, परंपरा व चिंतांना आणि त्यांच्या संघर्षांना सादर करते. प्रामुख्याने महिला कलाकार व महिलांची टीम असलेल्या या शोचे लेखन देविका भगत, संवादलेखन इशिता मोइत्राने केले आहे. ही सीरिज २५ जानेवारी २०१९ पासून पाहायला मिळणार आहे.
'फोर मोर शॉट्स प्लीज' या ट्रेलरमध्ये चार महिलांमधील मौजमजा, गमतीजमती, त्यांचे एकमेकांप्रती प्रेम आणि त्या आधुनिक जीवनातील संघर्षाचा कशाप्रकारे सामना करतात, त्यांच्या चिंता, आकांक्षा आणि संघर्षांची एक झलक दाखवण्यात आली आहे. अंजना ही एकटी आई आहे आणि तिच्या माजी पतीसोबतच्या नात्यामध्ये खूपच चढ-उतार आहेत. तिला भावनिकदृष्ट्या व एक स्त्री म्हणून अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. हुशार, यशस्वी, मुक्त व नीडर स्वतंत्र पत्रकार दामिनीचा तिच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरुषाची गरज नाही यावर विश्वास आहे. ती तिचे एक स्त्री म्हणून जीवन व्यावहारिक पद्धतीने जगते. ट्रेलरमध्ये सिद्धीला सामना कराव्या लागणाऱ्या असुरक्षिततेबाबत दाखवण्यात आले आहे. या चौघींमध्ये विभिन्नता असताना देखील चांगली मैत्री आहे आणि ही मैत्री त्यांच्या जीवनाचा आधार आहे. हीच मैत्री त्यांच्या जीवनातील अडथळ्यांमध्ये त्यांना सहाय्य करते.