Join us

Friendship Day 2019 : ‘या’ स्टार्सनी मैत्रीसाठी लावली जिवाची बाजी !

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2019 12:55 PM

या सर्व चित्रपटात मैत्रीची अशी परिभाषा सादर करण्यात आली आहे, जी पाहून लोकं म्हणू लागले आहेत की, मैत्री असावी तर अशी. आज ‘फे्रंडशिप डे’ निमित्त अशाच काही चित्रपटांबाबत जाणून घेऊया...

-रवींद्र मोरेबॉलिवूडमध्ये मैत्रीवर बरेच चित्रपट बनले आहेत. पैकी काही चित्रपट असे आहेत की, केवळ त्यांच्या भूमिकाच हिट झाल्या नाही तर त्यातील डायलॉगदेखील लोकांच्या तोंडावर अजूनही कायम आहेत. मग ‘शोले’ मधील जय आणि विरुची मैत्री असो वा ‘कुछ कुछ होता है’ मधील राहुल आणि अंजलीची मैत्री. या सर्व चित्रपटात मैत्रीची अशी परिभाषा सादर करण्यात आली आहे, जी पाहून लोकं म्हणू लागले आहेत की, मैत्री असावी तर अशी. आज ‘फ्रेंडशिप डे’ निमित्त अशाच काही चित्रपटांबाबत जाणून घेऊया...* कुछ कुछ होता है (अंजली-राहुल)

‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटास कोणीही विसरु शकत नाही. या चित्रपटातील शाहरुख खानचा ‘प्यार दोस्ती है’ हा डायलॉग सर्वात जास्त फेमस झाला होता. शिवाय या चित्रपटात ‘फ्रेंडशिप डे’ मोठ्या उत्साहात साजरा करतानाही दाखविले आहे. 'कुछ कुछ होता है' हा चित्रपट तसा मैत्रीवरच आधारित होता, ज्यात अंजलीची भूमिका साकारणारी काजोल, राहुल अर्थात शाहरुख खानसाठी आपल्या प्रेमाचा त्याग करुन त्याचे टीनासोबत लग्न करुन देते.* शोले (जय-वीरू)

कोणत्याही मैत्रीमध्ये प्रामाणिकपणा आणि प्रेम असणे सर्वात महत्त्वाचे असते. याचे सर्वोत्कृष्ट उदाहरण ‘शोले’ चित्रपटातील जय आणि विरु आहे. या चित्रपटात अमिताभ आणि धर्मेंद्र यांची जोडी मैत्रीची अशी परिभाषा दर्शवितात जी आजदेखील लोकं विसरु शकले नाहीत. एवढेच नव्हे तर या चित्रपटात जय मित्रासाठी आपले प्राणदेखील गमवितो.* मुन्नाभाई एमबीबीएस (सर्किट-मुन्नाभाई)या चित्रपटात संजय दत्त आणि अरशद वारसी यांची मैत्रीदेखील लोकांन खूप आवडली होती. यात सर्किट आपला मित्र मुन्नाभाईची प्रत्येक ईच्छा पूर्ण करतो. एकदा तर लॅबमध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी आपला मित्र मुन्नासाठी एकाचे शवच घेऊन येतो. या सीनने हे सिद्ध केले होते की, मैत्री किती अनमोल असते.* मैंने प्यार किया (प्रेम-सुमन)या चित्रपटात सलमानने प्रेम आणि भाग्यश्रीने सुमनची भूमिका साकारली होती. यात मैत्रीचे रुपांतर प्रेमात होताना दाखविले आहे, सोबतच हे देखील दाखविले आहे की, प्रेम अर्थात सलमान आपल्या मैत्रिणीवर जेव्हा समस्या येतात तेव्हा तो कसा त्या समस्यांचा सामना करतो.* दिल चाहता है (आमिर, सैफ, अक्षय खन्ना)आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्नाचा चित्रपट ‘दिल चाहता है’ मध्ये खऱ्या मैत्रीची उत्कृष्ट कहाणी दर्शविली आहे. यात दाखविले आहे की, आयुष्यात फक्त एकच नव्हे तर त्याहीपेक्षा जास्त मित्रदेखील मनात बसलेले असतात की, आपण त्यांच्यापासून कधीही दूर जाणे पसंत करत नाही.* जिंदगी ना मिलेगी दोबारा (ऋतिक,फरहान,अभय देओल)मित्रांसाठी मित्र कसे मैत्री निभवतात, हे या चित्रपटात उत्कृष्टपणे सादर केले आहे. यात दाखविले आहे की, एका मित्राचे लग्न होण्याअगोदर तिनही मित्र अर्थात ऋतिक, फरहान अख्तर आणि अभय देओल फिरायला एकसोबत जातात आणि हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील सर्वात शानदार प्रवास असतो.

* 3 इडियट्स (आमिर खान, शर्मन जोशी, आर माधवन)

तीन मित्रांची खरी मैत्री दर्शविणारा हा चित्रपट कोण विसरणार आहे. या सुपरड्यूपर चित्रपटात आमिर खान, शर्मन जोशी आणि आर माधवन यांची जी मैत्री दाखविली आहे, त्याला तोड नाही. मैत्रीसाठी काही पण करायला तयार असलेले हे मित्र उत्कृष्ट मैत्रीचा चांगला संदेश या चित्रपटातून देऊन गेले. 

टॅग्स :बॉलिवूडअमिताभ बच्चनशाहरुख खानकाजोलधमेंद्रसंजय दत्तसलमान खानआमिर खान