Join us

Lock Upp: साईशा किंवा पुनम पांडे नव्हे तर 'ही' स्पर्धक घेते सर्वाधिक मानधन; एका आठवड्याची फी ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2022 20:02 IST

Lock Upp: सध्या या शोमधील साईशा शिंदे, पूनम पांडे, शिवम हे काही स्पर्धक सातत्याने चर्चेत येत आहेत. त्यामुळे हे स्पर्धक सर्वात जास्त मानधन घेत असतील असं प्रेक्षकांना वाटतं.

अभिनेत्री कंगना रणौतचा लॉक अप (Lock Upp) या रिअॅलिटी शोने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. त्यामुळे सध्या या शोची तुलना बिग बॉससोबत केली जात आहे. आतापर्यंत या शोमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाने त्यांच्या जीवनातील काही गुपितं जाहीरपणे सांगितली आहेत. त्यामुळे हा शो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. घरातील स्पर्धकांच्या सिक्रेटप्रमाणेच त्यांच्यातील वाद, मैत्री यांमुळेही हा कार्यक्रम चर्चेत येत आहे. यामध्येच या कार्यक्रमात सर्वात जास्त मानधन कोण घेतं याची चर्चा रंगली आहे.

सध्या या शोमधील साईशा शिंदे, पूनम पांडे, शिवम हे काही स्पर्धक सातत्याने चर्चेत येत आहेत. त्यामुळे हे स्पर्धक सर्वात जास्त मानधन घेत असतील असं प्रेक्षकांना वाटतं. मात्र, बॉलिवूड लाइफनुसार, या सगळ्यांना मागे टाकत एक महिला स्पर्धक सगळ्यात जास्त मानधन घेते. विशेष म्हणजे तिचं एका आठवड्याचं मानधन ऐकून सगळे चक्रावून जातील.

लॉक अपमधील स्पर्धक अंजली अरोरा सर्वाधिक मानधन घेणारी स्पर्धक ठरली आहे. अंजली एका आठवड्यासाठी ३ ते ४ लाख रुपये मानधन घेते. तिच्या पाठोपाठ साईशा आणि पूनम पांडे यांचा क्रमांक लागतो. या दोघी अनुक्रमे एका आठवड्यासाठी १ लाख व ३ लाख रुपये घेतात.

दरम्यान, अंजली अरोरा लोकप्रिय अभिनेत्री आहे. कच्चा बदाम या गाण्यामुळे ती रातोरात लोकप्रिय झाली. त्यामुळे आज सोशल मीडियावर तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.

टॅग्स :लॉक अपटेलिव्हिजनकंगना राणौतसेलिब्रिटी