सोनी सब वाहिनीवर लवकरच नवीन मालिका 'मंगलम दंगलम- कभी प्यार कभी वार' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विनियार्ड फिल्म्सच्या आश्विनी यार्दी यांची निर्मिती असलेली ही मालिका सासरा आणि त्याचा जावई यांच्यामधल्या दंगलीवर भाष्य करते. ही मालिका १३ नोव्हेंबरपासून सोमवार ते शुक्रवार दरम्यान रोज सायंकाळी साडे सात वाजता फक्त सोनी सबवर दाखवला जाईल.
वडिलांचे मुलीसोबतचे नाते अत्यंत घट्ट असल्यामुळे त्यांना आपल्या मुलीचे लग्न लावून देणे खूप कठीण जाते. पण प्रेम त्याचा मार्ग शोधतेच आणि मुलीला आपल्या वडिलांचे घर सोडून आपल्या स्वप्नातल्या राजकुमाराकडे जाण्याचा दिवस येऊन ठेपतो. ही मालिका संभाव्य नवरा अर्जुन आणि त्याचे सासरे संजीव सकले यांच्यातील नात्याभोवती फिरतो. अर्जुन आपण संजीवला आपण त्याच्या मुलीसाठी सर्वोत्तम पुरूष आहोत हे सिद्ध कऱण्याच्या प्रयत्नात असतो तर संजीवची ही खात्री असते की त्याच्या मुलीसाठी सर्वोत्तमातले सर्वोत्तम स्थळ मिळाले पाहिजे.करणवीर शर्माने केलेली नागार्जुन कुट्टी किंवा अर्जुन ही व्यक्तिरेखा इंदोरमध्ये स्थित दक्षिण भारतीय कुटुंबातली आहे. तो एक अत्यंत देखणा पुरूष आहे आणि व्यवसायाने वकील आहे आणि हा या शोमधील एकमेव शहाणपणाचा घटक आहे. अर्जुन मनिषा रावतने साकारलेल्या अत्यंत साध्या आणि हुशार रूमीला भेटतो. काळ उलटतो तसे अर्जुनला रूमी आवडते आणि तो तिच्या प्रेमात पडतो. रूमीचे वडील संजीव सकलेचा यांची व्यक्तिरेखा ख्यातनाम अभिनेता मनोज जोशी यांनी केली असून ते अत्यंत कठोर उच्च मध्यमवर्गीय बिझनेसमन आहेत. एक स्वयंभू व्यक्तिमत्व असलेल्या संजीव यांच्या मेहनतीमुळे त्यांना शहरात खूप मान आहे. रूमीला तिच्या वडिलांनी राजकुमारीसारखे वाढवले आहे. भारतीय कुटुंब व्यवस्थेच्या परंपरा आणि नीतिमत्ता रूजलेली रूमी आपल्या ज्येष्ठांचा आदर करते. तिचे आपल्या वडिलांवर खूप प्रेम आहे आणि आपल्या आयुष्याच्या प्रत्येक निर्णयासाठी ती त्यांच्याकडे पाहते. अर्जुनसमोर रूमीच्या वडिलांना तिच्याशी लग्न करण्यासाठी तयार करण्याचे कठीण काम येते. अर्जुन आणि संजीव यांच्यामध्ये ही लढाई सुरू होते कारण अर्जुनला रूमीशी लग्न करायचे असते आणि तिच्या वडिलांना तिला आपल्यासोबत ठेवायचे असते.संजीवची पत्नी संगीता सकलेचा (अंजली गुप्ता) ही एक सर्वसाधारण गृहिणी, अत्यंत साधी स्त्री असून ती आपल्या कुटुंबाच्या कल्याणाची सतत काळजी करत असते. अर्जुनची आई चारूलता कुट्टी (अनिता कुलकर्णी) इंदोरमध्ये कायदा व्यावसायिक आहे, ती अत्यंत कठोर आई आहे आणि पारंपरिक विचारसरणी असलेली आहे तर त्याचे वडील व्यंकटेश कुट्टी (अभय कुलकर्णी) हे निवृत्त वकील आणि सल्लागार आहेत ज्यांना आपली बायको चारूलता हिच्याकडे विनोदकरण्यात आणि संगीताचा अभ्यास करण्यात वेळ घालवणे आवडते. इतर महत्त्वाच्या व्यक्तिरेखांमध्ये अत्यंत हुशार आणि मजेशीर दादी (शुभा खोटे) अर्जुनची बहीण ललिता (कृतिका शर्मा) आणि रूमीचा भाऊ साहिल (प्रविष्ट मिश्रा) यांचा समावेश आहे.