सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा ११ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या सिनेमासोबतच बॉक्स ऑफिसवर 'जेलर', 'OMG 2' हे सिनेमादेखील रिलीज झाले. परंतु, कमाईच्या बाबतीत 'गदर 2' ने या दोन्ही सिनेमांना मागे टाकलं. विशेष म्हणजे या सिनेमानंतर रिलीज झालेला 'ड्रीम गर्ल 2' या सिनेमानेही १०० कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे सध्या 'गदर 2' आणि ड्रीम गर्ल 2 या सिनेमांमध्ये कमाईच्या बाबतीत चढाओढ लागली आहे. म्हणूनच, रिलीजच्या 49 व्या दिवशी 'गदर 2' ची कमाई किती कोटींच्या घरात पोहोचली ते पाहुयात.
गदरनंतर तब्बल २१ वर्षानंतर गदर २ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी या सिनेमाची घोषणा केल्यापासून तो सातत्याने चर्चेत येत होता. विशेष म्हणजे हा सिनेमा रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला भरघोस प्रतिसाद दिला. सिनेमा रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्येच या सिनेमाने १०० कोटींचा टप्पा गाठला होता. विशेष म्हणजे या सिनेमाची ही यशस्वी घोडदौड अद्यापही कायम आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, हा सिनेमा रिलीज होऊन ४९ दिवस झाले आहेत. या ४९ दिवसांमध्ये या सिनेमाने ५२५ कोटींचा गल्ला जमवला आहे. तर, या सिनेमाने वर्ल्डवाइड ६८५ कोटींची कमाई केली आहे. विशेष म्हणजे केवळ ७५ कोटींमध्ये तयार झालेल्या या सिनेमाने तगडी कमाई केली आहे.
दरम्यान, या सिनेमाने पहिल्या आठवड्यात २८४.६३ कोटी, दुसऱ्या आठवड्यात १३४.४७ कोटी, तिसऱ्या आठवड्यात ६३.३५ कोटी, चौथा आठवडा २७.५५ कोटी, पाचवा आठवडा ७.२८ कोटी, सहावा आठवडा ४.७२ कोटी इतकी कमाई केली आहे. तसंच रिलीजच्या ४८ व्या दिवशी या सिनेमाने केवळ ०.४ कोटींची कमाई केली आहे.