शानदार... जबरदस्त... भारीच...! 'गदर-२' ची बॉक्स ऑफिसवर बम्पर कमाई, ६ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 09:01 AM2023-08-17T09:01:01+5:302023-08-17T09:05:23+5:30

सनी देओलचा गदर २ बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करतोय.

Gadar 2 box office collection day 6 sunny deol film earn up to rs 35 crore and crosses 262 cr net india | शानदार... जबरदस्त... भारीच...! 'गदर-२' ची बॉक्स ऑफिसवर बम्पर कमाई, ६ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

शानदार... जबरदस्त... भारीच...! 'गदर-२' ची बॉक्स ऑफिसवर बम्पर कमाई, ६ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

googlenewsNext

सनी देओलच्या गदर २ ची बॉक्स ऑफिसवर आलेली  त्सुनामी काही थांबवण्याचे नाव घेत नाहीय. या सिनेमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय.  सनी देओलच्या २००१ साली प्रदर्शित झालेल्या गदर चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. तब्बल २२ वर्षांनी या सुपरहिट सिनेमाच्या सीक्वेलसाठी प्रेक्षकही आतुर होते. 15 ऑगस्टला तर 'गदर २' ने हिंदी चित्रपटांच्या इतिहासात एक नवा विक्रम केला. या सिनेमाने रिलीज झालेल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर आपली पकड कायम ठेवली आहे. आता या सिनेमाचे सहाव्या दिवसाचे कलेक्शनही समोर आले आहे. 

१० ऑगस्टला रिलीज झालेल्या या सिनेमात  सनी देओल आणि अमीषा पटेल, उत्कर्ष शर्मा आणि मनीष वाधवा यांनी जबरदस्त अभिनय केला आहे. परिणामी बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा  ब्लॉकबस्टर ठरला. या गदर २ ची घोषणा झाल्यापासूनच हा सिनेमा चांगली कमाई करेल असा अंदाज बांधला जात होता. आणि हा सिनेमा प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरला. 

पहिल्या दिवशी सिनेमाने  40.10 कोटींची  कमाई केली. तर दुसऱ्या दिवशी 43.08कोटींची. तिसऱ्या दिवशी  51.70  कोटी आणि चौथ्या दिवशी म्हणजे 38.70 कोटींची. रिलीजच्या पाचव्या दिवशी म्हणजेच १५ ऑगस्टला  55.50 कोटी रुपयांची कमाई करत सिनेमाने रेकॉर्ड केला. तर सहाव्या दिवशी बुधवारी गदर २ ने 33.50 कोटींचा गल्ला जमावला आहे. 'गदर 2' चित्रपटाचे देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर एकूण कलेक्शन आता 262.48 कोटी रुपयांवर गेले आहे.


तारा सिंग आणि सकिना यांच्या जोडीने पुन्हा एकदा गदरमध्ये आपली जादू दाखवली आहे. सनी देओल आणि अमिषा पटेल या जोडीला पूर्वीसारखेच प्रेम मिळाले आहे. 
 

Web Title: Gadar 2 box office collection day 6 sunny deol film earn up to rs 35 crore and crosses 262 cr net india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.