Join us

३५ वर्षांनी लहान असलेल्या 'या' अभिनेत्रीबरोबर सनी देओलला करायचं आहे काम, म्हणाला, "हिरो हिरोईनसारखी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2023 3:08 PM

सनी देओलने व्यक्त केली 'या' बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर काम करण्याची इच्छा, म्हणाला...

बॉलिवूड अभिनेता सनी देओल त्याच्या 'गदर २' चित्रपटामुळे चर्चेत आहे. २००१ साली प्रदर्शित झालेल्या 'गदर' या सिनेमाने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. या चित्रपटातील गाणीही प्रचंड हिट झाली होती. तब्बल २२ वर्षांनी या चित्रपटाचा सीक्वेल 'गदर २' प्रेक्षकांच्या भेटीला आला. 'गदर' प्रमाणेच 'गदर २' देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सनी देओल अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. 

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सनी देओलने ३५ वर्षांनी लहान असलेल्या बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 'झूम'ला दिलेल्या मुलाखतीत सनी देओलला "कोणत्या अभिनेत्रीबरोबर काम करायला आवडेल", असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत सनी देओलने आलिया भट्टचं नाव घेतलं. तो म्हणाला, "मला आलिया आवडते. तिच्याबरोबर काम करायला मजा येईल. हिरो हिरोईनसारखी भूमिका असावी, असं मी म्हणत नाही. मला तिच्या वडिलांची भूमिकाही करायला आवडेल." 

'सुभेदार' फेम अजय पूरकर यांची दाक्षिणात्य सिनेसृष्टीत एन्ट्री, 'या' चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

 ६९व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये आलियानेयंदाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारावर नाव कोरलं. 'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमासाठी हा पुरस्कार तिला देण्यात आला. आलिया मुख्य भूमिकेत असलेला 'रॉकी और रानी की प्रेमकहाणी' हा चित्रपट गेल्याच महिन्यात प्रदर्शित झाला. 'गदर २'बरोबर आलियाचा हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

भाऊ असावा तर असा! शिव ठाकरेने रक्षाबंधन गिफ्ट म्हणून बहिणीला दिला IPhone, म्हणाला...

दरम्यान, 'गदर २'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटाने आतापर्यंत ४५६ कोटींहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटात सनी देओल, अमीषा पटेल आणि उत्कर्ष शर्मा यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

टॅग्स :सनी देओलआलिया भटअमिषा पटेलबॉलिवूड