Gadar-Ek Prem Katha: शूटिंगदरम्यान अचानक जमली चार लाख लोकांची गर्दी, दिग्दर्शकाचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2023 09:22 AM2023-06-10T09:22:13+5:302023-06-10T09:23:09+5:30
Gadar-Ek Prem Katha: २२ वर्षांनंतर 'गदर - एक प्रेम कथा' हा चित्रपट नुकताच पुन्हा एकदा सिनेमागृहात प्रदर्शित झाला तेव्हा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते.
२२ वर्षांनंतर 'गदर - एक प्रेम कथा' (Gadar Ek Prem Katha) हा चित्रपट नुकताच पुन्हा एकदा सिनेमागृहात प्रदर्शित झाला तेव्हा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. अभिनेता सनी देओल(Sunny Deol)च्या प्रत्येक डायलॉगवर लोक शिट्टी वाजवत आहेत. गेल्या शुक्रवारी रात्री मुंबईत चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान सनी देओल, अमिषा पटेल, दिग्दर्शक अनिल शर्मा आणि गायक उदित नारायण यांच्या उपस्थितीने स्क्रिनिंग खास बनले. सनी देओलने 'हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा' हा डायलॉग बोलताच संपूर्ण थिएटर टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजला. तर तिथे उदित नारायणने गायलेले 'मैं निकला गड्डी लेकर' हे गाणे ऐकून लोक नाचू लागले. अभिनेता सनी देओल, अमिषा पटेल आणि चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी नुकतेच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध शहरांना भेट दिली.
यादरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी शूटिंगदरम्यानचा एक किस्सा शेअर करताना सांगितले की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान चार लाख लोकांची गर्दी जमली होती, त्यामुळे चित्रपटाचे शूटिंग थांबवावे लागले.
सनी देओल म्हणाला, 'मला माहित नव्हते की लोक पुन्हा चित्रपट पाहायला येतील, मी आतून खूप घाबरलो होतो. आम्ही चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत एवढा विचार करत आहोत, लोक चित्रपट बघायला येतील की नाही माहीत नाही, अशी भीती निर्माण झाली होती. लोकांचे खूप प्रेम आहे, मला वाटते 'गदर' लोकांच्या मनात अशा प्रकारे बसला आहे की लोकांना तो पुन्हा पुन्हा पहायला आवडतो. यापूर्वी गदर प्रदर्शित झाला तेव्हा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालेल हे माहीत नव्हते.
आणि सर्वांचीच तोंडं बंद झाली...
इंडस्ट्रीतील लोक म्हणायचे हा पंजाबी चित्रपट आहे, हिंदीत डब करून रिलीज करा, अनेक वितरक चित्रपट विकत घ्यायलाही तयार नव्हते. पण जेव्हा हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि लोकांना तो इतका आवडला की सर्वांचीच तोंडे बंद झाली. आजही हा चित्रपट ज्याप्रकारे लोकांना आवडतो, त्यामुळे आम्हाला त्याचा २ भाग बनवण्याचे धैर्य मिळाले. 'गदर २'ने कोणाचीही निराशा करू नये, असाही आम्ही प्रयत्न केला आहे.
'गदर - एक प्रेम कथा' हा चित्रपट २२ वर्षांपूर्वी १५ जून २००१ रोजी प्रदर्शित झाला होता. २२ वर्षांनंतर हा चित्रपट १५ जूनला प्रदर्शित होण्याऐवजी आठवडाभर आधी प्रदर्शित झाला.