Join us

Gandhi Jayanti : या अभिनेत्यांनी मोठ्या पडद्यावर साकारले महात्मा गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2018 12:00 PM

Gandhi Jayanti : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150वी जयंती आहे. देशभरात गांधी जयंती साजरी करण्यात येत आहे. महात्मा गांधी आणि अनेक स्वातंत्र्य सेनानींच्या संघर्षामुळे ब्रिटीशांच्या जाचातून आपला देश मुक्त झाला.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150वी जयंती आहे. देशभरात गांधी जयंती साजरी करण्यात येत आहे. महात्मा गांधी आणि अनेक स्वातंत्र्य सेनानींच्या संघर्षामुळे ब्रिटीशांच्या जाचातून आपला देश मुक्त झाला. यांच्या लढ्यामुळे 1947 साली आपला देश स्वतंत्र झाला. महात्मा गांधींनी आपल्या देशासाठी दिलेला लढा आपण अनेक माध्यमांतून पाहतो, ऐकतो, वाचतो. बॉलिवूडमध्येही महात्मा गांधींच्या आयुष्यावर आधारित अनेक सिनेमांची निर्मिती करण्यात आली. बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी मोठ्या पडद्यावर बापूंची भूमिका प्रभावीपणे साकारली. या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाददेखील दिला.

- महात्मा गांधींची भूमिका साकारणारे कलाकार 

1. हे राम - नसीरुद्दीन शाहभारत देशाची फाळणी आणि महात्मा गांधींजींची हत्या हे विषय 'हे राम' सिनेमामध्ये मांडण्यात आले होते. महात्मा गांधी यांची भूमिका साकारणाऱ्या नसीरुद्दीन शाह यांच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केले. 

2. लगे रहो मुन्नाभाई - दिलीप प्रभावळकरराजकुमार हिराणी दिग्दर्शित 'लगे रहो मुन्नाभाई' सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर गांधीगिरी पाहायला मिळाली. या सिनेमामध्ये अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी महात्मा गांधींची भूमिका साकारली. या सिनेमामध्ये संजय दत्त आणि अरशद वारसी मुख्य भूमिकेत होते. राजकुमार हिराणी यांनी गांधींजींचे विचार नवीन पद्धतीनं आणि प्रभावीपणे मोठ्या पडद्यावर मांडले.

3. गांधी - बेन किंग्सलेमहात्मा गांधी यांची जीवनशैली आणि त्यांच्या अहिंसक आंदोलनामुळे ब्रिटीश हादरले होते. अहिंसेचा पुजक असलेला एक व्यक्ती ब्रिटीश राजवट उलथवून लावू शकतो, यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. सुप्रसिद्ध ब्रिटीश सिनेनिर्माते रिचर्ड एटनबरो यांनी बापूंच्या जीवनशैलीवर आधारित 'गांधी' सिनेमाची 1982 साली निर्मिती केली. सिनेमामध्ये ब्रिटीश अभिनेता बेन किंग्सले यांनी महात्मा गांधींजींची भूमिका साकारली होती.

4. सरदार - अन्नू कपूर   1993 साली बॉक्सऑफिसवर झळकलेल्या 'सरदार' सिनेमामध्ये महात्मा गांधींची भूमिका अन्नू कपूर यांनी साकारली तर परेश रावल हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भूमिकेत पाहायला मिळाले होते.  

5. गांधी, माय फादर - दर्शन जरीवाला फिरोज अब्बास खान यांनी 2007मध्ये 'गांधी, माय फादर' सिनेमाद्वारे महात्मा गांधी आणि त्यांचा मुलगा हरीलाल गांधी यांच्यातील संबंध पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर मांडण्याचा प्रयत्न केला.  'गांधी, माय फादर' हा सिनेमा हरीलाल गांधी यांच्या बायोग्राफीवर आधारित होता. दर्शन जरीवाला यांनी गांधींची भूमिका साकारली. यामध्ये अक्षय खन्नाचीही प्रमुख भूमिका होती. या सिनेमाला तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले. 

टॅग्स :महात्मा गांधीबॉलिवूडनसिरुद्दीन शाह