Join us

गणपती बाप्पा मोरया! कार्तिक आर्यन लालबागच्या चरणी नतमस्तक, बाप्पाचं घेतलं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 12:53 PM

अभिनेता कार्तिक आर्यनने नुकतंच लाल बागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. कार्तिकने फोटो शेअर करत आपला आनंद व्यक्त केला.

आज देशभरात गणेशोत्सव साजरा केला आहे.  घरोघरी बाप्पा थाटात विराजमान होत आहे. सर्वसामान्य लोकांपासून ते मोठ-मोठ्या सेलेब्रेटींपर्यंत सर्वजण बाप्पाच्या आगमनाने प्रचंड उत्साहात आहेत. तसेच गणेशोत्सवाच्या या दहा दिवसांत लाल बागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी असते. अनेक बॉलिवूड सेलिब्रेटीसुद्धा याठिकाणी जाऊन बाप्पाच्या चरणी नतमस्तक होतात. अभिनेता कार्तिक आर्यनने नुकतंच लाल बागच्या राजाचं दर्शन घेतलं आहे. कार्तिकने फोटो शेअर करत आपला आनंद व्यक्त केला आहे.

कार्तिकने पहिल्याच दिवशी सकाळी लवकर जाऊन लालबाग राजाचे दर्शन घेतले. कार्तिक आर्यनचे फोटो सोशल मिडीयावर चांगले व्हायरल झालेत. या फोटोत कार्तिकने कुर्ता परिधान केलेला दिसून येतोय. 

यंदाचं लालबागच्या राजाचं हे 90 वं वर्ष आहे.   गणपती आणि लालबाग हे समीकरण फक्त मुंबईतच नाही तर संपूर्ण राज्यभरात माहित आहे. लालबागचा राजाची विशेष ख्याती आहे. त्याचं दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक लालबागमध्ये दाखल होत असतात. नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाला ओळखले जाते. यंदा लालबागच्या राजाच्या दारी रायगडाची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. तर रायगडावरील शिवराज्याभिषेकाचं दर्शन यावेळी लालबागच्या राजाच्या दरबारात होईल

कार्तिकसाठी हे वर्ष चांगल राहिलं आहे. त्याचा सत्यप्रेम की कथा हा सिनेमे यशस्वी झाला. वर्षाच्या सुरुवातीला एक लक्झरी अपार्टमेंट खरेदी केले होते. त्यानंतर त्याने पुन्हा ओशिवरामधील लोटस डेव्हलपर्सच्या लोटस 'सिग्नेचर' इमारतीमध्ये नवीन  10 कोटींची प्रॉपर्टी खरेदी केली. कार्तिकने त्याच्या करिअरच्या छोट्या कारकीर्दीत खुप मोठी मजल मारली आहे

कार्तिकच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर,  सध्या कार्तिक  'चंदू चॅम्पियन' चित्रपटात पाहायला मिळणार आहे.  कबीर खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट मुरलीकांत पेटकर यांच्या जीवनावर आधारित असणार आहे. मुरलीकांत पेटकर हे सुवर्णपदक विजेते असून त्यांनी 1972 मध्ये जर्मनी येथे झालेल्या पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकले होते. मीडिया रिपोर्टनुसार हा चित्रपट 14 जून 2024 पर्यंत रिलीज होऊ शकतो.   

टॅग्स :कार्तिक आर्यनलालबागचा राजागणेशोत्सवबॉलिवूड