Join us

तुम ‘स्टुडंट ऑफ द ईअर’ही रहो बहन...! ‘गंगूबाई काठियावाडी’च्या टीजरनंतर का ट्रोल होतेय आलिया भट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 3:56 PM

Gangubai Kathiawadi Teaser : दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला आणि सोशल मीडिया दोन भागात विभागला गेला.

ठळक मुद्दे ‘गंगूबाई काठीयावाडी’ चित्रपटाची कथा ‘माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे.

दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ या सिनेमाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला आणि सोशल मीडिया दोन भागात विभागला गेला. होय, सोशल मीडियावरच्या काही लोकांना या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेली आलिया भट जाम आवडली. तर काहींनी आलियाला या रोलमध्ये चक्क ‘फेल’ केले. या रोलमध्ये आलिया कुठेही फिट बसत नाही, असे कोणी लिहिले. तर ‘तू स्टुडंट ऑफ द ईअर ही रह बहन,’ अशा शब्दांत आलियाला ट्रोल केले.

नुकताच संजय लीला भन्साळी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत  ‘गंगूबाई काठीयावाडी’ चित्रपटाचा टीझर शेअर करण्यात आला. दीड मिनिटांच्या टीझरमध्ये आलियाचे एक कधीही न पाहिलेले रुप प्रेक्षकांना पाहायला मिळाले. आलियाचे चाहते तर तिचे हे हटके रूप पाहून हरकून गेले. अनेकांनी आलियाचे प्रचंड कौतुक केले. पण अनेकांना गंगूबाई काठीयावाडीच्या भूमिकेतील आलिया रूचली नाही. साहजिकच आलिया ट्रोल झाली.

 

आलिया या रोलसाठी अतिशय बालिश वाटतेय, असे मत काहींनी नोंदवले तर काहींनी आलियाच्या तोंडच्या डायलॉगची खिल्ली उडवली.आलियाऐवजी भन्साळींनी या सिनेमात विद्या बालन, प्रियंका चोप्रा किंवा दीपिका पादुकोणला घ्यायला हवे होते, असेही अनेकांचे मत पडले.आलिया बच्ची दिसतेय, गंगूबाई कुठूनच दिसत नाही, असे एका युजरने लिहित तिला ट्रोल केले.

 ‘गंगूबाई काठीयावाडी’ चित्रपटाची कथा ‘माफिया क्वीन ऑफ मुंबई’ या पुस्तकावर आधारित आहे. गंगूबाई वयाच्या 16 व्या वर्षीच प्रेमात पडल्या होत्या. वडिलांच्या अकाउंटन्टवर त्या प्रेम करू लागल्या होत्या. त्या मुलासोबत लग्न करून त्या मुंबईला आल्या. त्यांनी नेहमीच अभिनेत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते. पण त्यांच्या पतीने गंगूबाईंना मुंबईच्या कामाठीपुरा रेड लाइट भागातील एका कोठ्यावर अवघ्या 500 रुपयांसाठी विकले होते.हुसैन जैदी यांच्या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे माफिया डॉन करीम लाला यांच्या गँगमधील एका माणसाने गंगूबाईंवर बलात्कार केला होता. त्यानंतर गंगूबाईंनी करीम लालांकडे न्याय मागितला होता. त्यानंतर गंगूबाईंनी करीम लालांना राखी बांधली. त्यानंतर त्या पुढे जाऊन मुंबईमधील सर्वात मोठ्या लेडी डॉन झाल्या.

 

टॅग्स :आलिया भट