Join us

गणपत पाटील यांच्या आत्मचरित्रावर चित्रपट

By admin | Published: October 29, 2015 11:13 PM

'हेडलाईन' या सोशल मीडिया व रेव्ह पार्टीचे दुष्परिणाम समाजासमोर आणणाऱ्या चित्रपटाने प्रकाशझोतात आलेले सुनील वाईकर दिग्गज अभिनेते गणपत पाटील यांच्या आत्मचरित्रावर चित्रपट बनविणार आहेत.

'हेडलाईन' या सोशल मीडिया व रेव्ह पार्टीचे दुष्परिणाम समाजासमोर आणणाऱ्या चित्रपटाने प्रकाशझोतात आलेले सुनील वाईकर दिग्गज अभिनेते गणपत पाटील यांच्या आत्मचरित्रावर चित्रपट बनविणार आहेत. सामाजिक प्रबोधनपर चित्रपटासोबतच विनोदी कथा फुलविण्याचेही कसब वाईकर यांनी नुकत्याच झालेल्या 'दगडाबाईची चाळ' या चित्रपटाद्वारे दाखवून दिले. या निमित्ताने हिंदीतील विनोदवीर राजपाल यादवची मराठीत एन्ट्री केली आहे. वाईकर यांनी पुरुषोत्तम, फिरोदियामधून अनेक पारितोषिके पटकावली. याच दरम्यान त्यांची भेट प्रख्यात दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांचे सहायक मुरलेधर बलतुरे यांच्याशी झाली. बलतुरेंनी त्यांना स्क्रिप्ट लेखन आणि लघुपटाचे धडे दिले. ‘पाचोळा’ या टेलिफिल्ममध्ये त्यांनी लेखन, दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी सांभाळली होती. २०१२ साली त्यांनी डोंबारी चित्रपटाची निर्मिती केली. ‘हेडलाईन'ला अनेक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिग्दर्शनासाठीचे पुरस्कार मिळाले.