Join us

कचरा वेचणाऱ्या भावांना मिळाली 'इंडियन आयडॉल'मध्ये गाण्याची संधी, होतोय कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 6:26 PM

'इंडियन आयडॉल'च्या १२व्या सीझनने अनेक कलाकारांच्या कौशल्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिग शो 'इंडियन आयडॉल'च्या १२व्या सीझनने अनेक कलाकारांच्या कौशल्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. अशा या मंचावर आणखी दोन प्रतिभावान कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी बोलावले होते, ज्यांना आधीच आपल्या कामाने सगळ्यांना प्रोत्साहित केले आहे. दिल्लीत राहणारे हाफिज आणि हबीबुर यांचा व्हिडीओ खुद्द आनंद महिंद्रा यांनीही शेअर केला होता.

दिल्लीच्या न्यू फ्रेंड्स कॉलनीमध्ये हाफिज आणि हबीबुर कचरा उचलण्याचे काम करतात. इंडियन आयडॉलच्या मंचाने या दोघांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी दिली. त्यांच्याविषयी बोलताना विशाल दादलानी म्हणाले की, 'आनंद महिंद्राने या दोन कलाकारांचा व्हिडीओ शेअर केला तेव्हा बर्‍याच लोकांनी मला टॅग केले आणि त्यांना एकदा तरी स्टेजवर बोलवावे असे सांगितले. मग मी त्यांचा आवाज ऐकला आणि मी चकीत झालो. या दोन्ही भावांचे तीन गायक जज आणि विशेष अथिती म्हणून आलेल्या 'जग्गु दादा' अर्थात अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी खूप कौतुक केले.

इंडियन आयडॉलमधून बोलावणे आल्यावर आता प्रत्येकजण सोशल मीडियावर हाफिज आणि हबीबुर यांना शुभेच्छा संदेश पाठवत आहे. बरेच लोक त्यांच्या संघर्षाची कहाणी सोशल मीडियावर मोठ्या संख्येने शेअर करत आहेत.

या दोन्ही भावांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना आनंद महिंद्राने लिहिले की, 'त्यांची प्रतिभा अजूनही कच्ची आहे आणि त्यांना प्रशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे. संगीताच्या पुढील प्रशिक्षणासाठी मला आणि रोहितला त्यांना पाठींबा द्यावा असे वाटते. संध्याकाळच्या वेळी त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी संगीत शिक्षक म्हणून काम करेल, असे कोणी दिल्लीमध्ये आहे का? कारण हे दोन भाऊ दिवसभर काम करत असतात.' 

टॅग्स :इंडियन आयडॉलजॅकी श्रॉफविशाल ददलानी