Join us

"केवळ अप्रतिम चित्रपट", 'नाळ २'साठी गश्मीरची खास पोस्ट, म्हणाला, "माझ्या चार वर्षाच्या मुलाने..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 13:27 IST

गश्मीर महाजनीने देखील 'नाळ' सिनेमाबाबत पोस्ट शेअर केली आहे. 

बहुचर्चित 'नाळ २' चित्रपट १० नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या 'नाळ' या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. या चित्रपटातून एक हृदयस्पर्शी कथा मांडण्यात आली होती. 'नाळ'मधील चैतूची कथा प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली होती. त्यामुळे या चित्रपटाच्या सीक्वेलबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती. 'नाळ'प्रमाणेच 'नाळ २'देखील प्रेक्षकांना भावला आहे. अनेकांनी या चित्रपटाबाबत पोस्ट शेअर केल्या आहेत. मराठी अभिनेता गश्मीर महाजनीने देखील 'नाळ' सिनेमाबाबत पोस्ट शेअर केली आहे. 

गश्मीरने त्याच्या चार वर्षाच्या मुलाबरोबर थिएटरमध्ये जाऊन 'नाळ २' हा चित्रपट पाहिला. चित्रपट पाहिल्यानंतर गश्मीर भारावून गेला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर याबाबत पोस्ट शेअर केली आहे. "केवळ अप्रतिम चित्रपट...माझ्या चार वर्षांच्या मुलाला थिएटरमध्ये सिनेमा पाहताना मजा आलेला हा पहिला सिनेमा आहे," असं गश्मीरने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

'नाळ २' या चित्रपटात श्रीनिवास पोकळे, त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दीप्ती देवी आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सुधाकर रेड्डींनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.  

टॅग्स :नाळगश्मिर महाजनीनागराज मंजुळे