Join us

गश्मीर ‘द डान्स’ गुरू

By admin | Published: May 01, 2017 5:37 AM

गश्मीर महाजनी एक चांगला अभिनेता असण्यासोबतच एक चांगला डान्सरदेखील आहे. तो गेली अनेक वर्षे नृत्याचे धडे इतरांना देत आहे.

गश्मीर महाजनी एक चांगला अभिनेता असण्यासोबतच एक चांगला डान्सरदेखील आहे. तो गेली अनेक वर्षे नृत्याचे धडे इतरांना देत आहे. स्वत:ची डान्स अ‍ॅकेडमी असलेला तो मराठी फिल्म इंडस्ट्रीमधील एकमेव अभिनेता आहे. गेली १५ वर्षे तो नृत्य शिकवत आहे. गश्मीरला लहानपणापासूनच डान्सची आवड होती. तो सांगतो, खरे तर परदेशात नृत्याचे प्रशिक्षण घेण्याची माझी इच्छा होती. माझी बहीण वॉशिंग्टन डिसीमध्ये राहते. पण परदेशात जाऊन प्रशिक्षण घेणे हे आर्थिकदृष्ट्या मला जमणारे नव्हते. त्यामुळे माझ्या बहिणीने ब्रिटनी स्पिअर्स आणि मायकल जॅक्सनसाठी ज्यांनी कोरिओग्राफी केली आहे, त्या जगप्रसिद्ध कोरिओग्राफर डॅरीन हॅन्सनच्या आठ डिव्हीडींचा संच एक ा दिवशी पाठवला. हा डिव्हीडींचा संच माझ्यासाठी मार्गदर्शक ठरला. बॅरनच्या डान्स अ‍ॅकेडमीत जे भाग घेऊ शकत नाहीत, अशा जगभरातल्या डान्सरसाठी हा खास बनवण्यात आला आहे. त्यातून मी अगदी एकलव्यासारखा डान्स शिकलो. त्यानंतर दहावी झाल्यावर उन्हाळ्याच्या सुटीत काही तरी वेगळे करावे म्हणून मी पुण्यातच एक हिपहॉप डान्सचे वर्कशॉप घेतले आणि त्याला १५-२० जण आले होते. तो वर्कशॉप खूप चांगला झाला होता. त्यात भाग घेतलेल्या लोकांनी पुन्हा असे वर्कशॉप घेण्याचा माझ्याकडे आग्रह धरला. तसेच डान्सचे क्लासेस घेण्याचे सुचवले आणि सहज टाइमपास म्हणून सुरू झालेल्या माझ्या वर्कशॉपना हळूहळू प्रोफेशनल रूप मिळाले आणि माझ्या डान्स अ‍ॅकेडमीचा जन्म झाला. गेल्या काही वर्षांमध्ये अ‍ॅकेडमीद्वारे वीस ते बावीस हजार लोकांना मी ट्रेन केलंय. आता भारतीय शास्त्रीय नृत्यापासून सालसा आणि झुंबापर्यंत अनेक नृत्यप्रकार माझ्या अ‍ॅकेडमीत शिकवले जातात. तीन वर्षांपासून ते ६० वर्षांपर्यंतचे विद्यार्थी या डान्स अ‍ॅकेडमीमध्ये शिकायला येतात. गश्मीर मायकल जॅक्सन यांना दैवत मानतो. तो सांगतो, ‘मायकल जॅक्सन यांच्याहून मोठा डान्सिंग स्टार आजपर्यंत जन्माला आलेला नाही आणि बॉलिवूडमधील माझा सर्वांत जास्त आवडणारा डान्सिंग स्टार गोविंदा आहे. माझ्या शालेय जीवनात त्यांना पाहूनच तर मी डान्स करायला शिकलो. अभिनेत्याला अभिनय करताना नृत्याचे अंग असणे किती गरजेचे आहे,’ हे त्यांना पाहून समजते.