Join us

'गाथा नवनाथांची' फेम जयेश आणि नकुलने घेतलं श्रीक्षेत्र नरसोबाची वाडीतील श्रीदत्तपादुकांचं दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 4:15 PM

गोरक्षनाथ प्रकटदिनानिमित्त जयेश शेवळकर आणि नकुल घाणेकर यांनी नरसोबाची वाडी येथे श्रीदत्तपादुकांचे दर्शन घेतले.

 'गाथा नवनाथांची' या मालिकेच्या माध्यमातून मच्छिन्द्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, रेवणनाथ या नाथांच्या कथा आणि त्यांचे महनीय कार्य  पाहणे प्रेक्षकांसाठी रंजक ठरते आहे. आत्तापर्यंत नाथपरंपरा, नाथांचे चमत्कार, त्यांच्या शक्तीची अनुभूती हे सर्व मालिकेत पाहायला मिळाले. अनेक यशस्वी भागांनंतरही 'गाथा नवनाथांची' ही  मालिका आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते आहे. आता मालिकेत नागनाथ आणि गुरुआई यांच्यातील युद्ध पाहायला मिळते आहे. २५ नोव्हेंबर रोजी गोरक्षनाथ यांचा प्रकटदिन आहे. 

या निमित्ताने मालिकेतील कलाकार जयेश शेवाळकर आणि नकुल घाणेकर यांनी श्रीक्षेत्र नरसोबाची वाडी येथील देवस्थानात जाऊन दर्शन घेतले. याबरोबरच मंदिरात त्यांनी पूजाही  केली. जयेश शेवाळकर आणि नकुल घाणेकर दोघांनीही दर्शनाचा लाभ घेतला. जयेश शेवाळकर मच्छिन्द्रनाथांच्या भूमिकेत आणि तर नकुल घाणेकर गोरक्षनाथ आणि महादेव यांच्या भूमिकेमधून  आपल्या भेटीस येत असतात.

गाथा नवनाथांची मालिका आता लवकरच ८०० भागांचा टप्पा पूर्ण करेल. गोरक्षनाथ प्रकटदिनानिमित्त जयेश शेवळकर आणि नकुल घाणेकर यांनी नरसोबाची वाडी येथे श्रीदत्तपादुकांचे दर्शन घेतले. तेथे पूजा केली आणि अभिषेकही केला. मंदिरात कलाकारांना बघताच भाविकांनी  गर्दी केली. मच्छिन्द्रनाथ आणि गोरक्षनाथ यांच्या भूमिकेत हे कलाकार नेहमीच मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळतात. आज साक्षात समोर पाहून भाविकांना मोह आवरला नाही. कित्येक भाविकांनी चक्क कलाकारांच्या पाय पडून नमन केले. कलाकारांना मिळालेले प्रेम पाहून तेही भावुक झाले. गोरक्षनाथ प्रकटदिनी आलेला हा अनुभव नक्कीच त्यांच्या लक्षात राहील.  

टॅग्स :सोनी मराठी