' महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेचं फॅन फॉलोईंग खूप आहे. गौरव मोरे आता जरी हास्यजत्रेत काम करत नसला तरीही अलीकडच्या काळात गौरवने हिंदी रिअॅलिटी शो आणि मराठी सिनेमांमध्ये अभिनय केलाय. गौरवच्या चाहत्यांसाठी खास बातमी ती म्हणजे नवीन वर्षात २०२५ मध्ये गौरवचा पहिला हिंदी सिनेमा रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे द फॅमिली मॅन या लोकप्रिय वेबसीरिजमधील अभिनेता शरीब हाश्मीसोबत गौरव झळकणार आहे. या सिनेमाचं नाव 'संगी'. जाणून घ्या
संगी म्हणजे काय?
संगी म्हणजेच मैत्री... त्यामुळे या सिनेमाचे कथानक मैत्रीभोवती फिरणारे आहे. मात्र पोस्टरमध्ये तीन मित्र दिसत असतानाच काही नोटाही दिसत आहेत. त्यामुळे आता पैसे आणि मैत्री यांचा एकमेकांशी काय संबंध असणार हे जाणून घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. एकंदरच हलकीफुलकी, हास्य आणि मनोरंजनाने भरलेली कथा असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच खिळवून ठेवणारा असेल, हे नक्की! या सिनेमात शरीब हाश्मी, संजय बिष्णोई, श्यामराज पाटील, विद्या माळवदे आणि गौरव मोरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
कधी रिलीज होणार संगी?
अर्मोक्स फिल्म्स आणि यंत्रणा फिल्म्स निर्मित , सुप्रीम मोशन पिक्चर्स आणि सत्यम ज्वेलर्स प्रस्तुत ‘संगी’ हा हिंदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुमित कुलकर्णी यांनी केले असून लेखन थोपटे विजयसिंह सर्जेराव यांचे आहे. रोहन भोसले, अरुण प्रभुदेसाई, पिंटू सॉ, मोनिका प्रभुदेसाई, प्रतीक ठाकूर, सुमित कुलकर्णी हे 'संगी'चे निर्माते आहेत. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि राहुल किरणराज चोप्रा सहनिर्माते आहेत. १७ जानेवारी २०२५ ला 'संगी' सिनेमा रिलीज होणार आहे.