शाहरूख खानच्या (Shah Rukh Khan ) स्टारडमबद्दल काय सांगायचं. सगळ्यांनाच ते ठाऊक आहे. पण शाहरूखची पत्नी गौरी खानही (Gauri Khan) मागे नाही. गौरीही (Gauri Khan Net Worth:) मोठी बिझनेसवुमन आहे. शाहरूखच्या नावाचं वलय असलं तरी गौरीनं स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. फिल्म इंडस्ट्रीत गौरीचं मोठं फ्रेंड सर्कल आहे.क्रूजवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी गौरीचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan Arrest update) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यनचा तुरूंगातील मुक्काम वाढणार की नाही, हे थोड्यात वेळात कळणार आहे. आज आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे आणि नेमका आजच त्याची आई गौरी खानचा वाढदिवस आहे. मुलगा अडचणीत असल्यामुळे साहजिकच यावर्षी गौरीच्या वाढदिवसावर नैराश्याचं सावट आहे.
8 ऑक्टोबर 1970 रोजी दिल्लीत गौरीचा जन्म झाला. गौरी14 वर्षांची आणि शाहरूख 19 वर्षांचा असताना त्यांची प्रथम नजरानजर झाली होती. शाहरूखने गौरीला पाहिले आणि पहिल्याच नजरेत तो तिच्या प्रेमात पडला. मग गौरी हीच जणू शाहरूखचा ध्यास बनली. त्याने गौरीसमोर प्रेम व्यक्त केलं. सुरुवातीला गौरी नकार देत राहिली. पण शाहरूखचं खरं प्रेम पाहून ती त्याच्यापासून फार काळ दूर राहू शकली नाही आणि मग सुरु झाली एक प्रेम कहाणी. पुढे लग्न झालं.शाहरूखचं करिअर बनवण्यात गौरीचा मोठा वाटा आहे. शाहरूखनं स्वत: अनेक मुलाखतीत हे सांगितलं आहे.
1991 मध्ये लग्न झालं तेव्हा शाहरूख व गौरी दोघंही मध्यवर्गीय कपल म्हणून ओळखलं जात होतं. पण यानंतर काही वर्षांतच दोघांनी यशाची नवी कहाणी लिहिली.शाहरूख बॉलिवूडचा किंगखान म्हणून ओळखला जातो. पण गौरीही कोट्यवधी रूपयांच्या संपत्तीची मालकीन (Gauri Khan Property)आहे. पेशाने इंटिरियर डिझायनर असलेल्या गौरीचं या क्षेत्रात मोठं नाव आहे. अगदी मुकेश अंबानी, Roberto Cavalli आणि Ralph Lauren यासारख्या जगातील सुप्रसिद्ध व्यक्तिंचं घर तिनं डिझाईन केलं आहे. बॉलिवूडच्याही अनेक बड्या सेलिब्रिटींच्या घराचं इंटिरिअर गौरीनं केलं आहे. मुंबईच्या जुहू या पॉश भागात तिचं स्वत:चं एक फ्लॅगशिप स्टोअर आहे. त्या ठिकाणी रॉबर्टो कॅवल्ली आणि रॉल्फ लॉरेन सारख्या आंतरराष्ट्रीय ब्रँड्सचे होमवेअर अॅक्सेंट उपलब्ध आहेत. याशिवाय, ती रेड चिलीज प्रॉडक्शन हाऊसची सह-संस्थापक देखील आहे. रिपोर्टनुसार, गौरी व शाहरूखचे वार्षिक उत्पन्न 256 कोटींच्या घरात आहे. शाहरूखची नेटवर्थ 5100 कोटी आहे तर गौरीची नेटवर्थ 1600 कोटी आहे. शानदार मन्नत नावाचा बंगला आहेच. दुबईतही अलिशान व्हिला सुद्धा आहे. याशिवाय गौरी खानच्या विदेशात अनेक ठिकाणी प्रॉपर्टी आहेत. 2018 मध्ये फॉर्च्युन इंडिया मॅगझिनच्या 50 प्रभावशाली महिलांच्या यादीत गौरीला स्थान मिळालं होतं.