Join us

'Cold Play' कॉन्सर्टनंतर १०० टन कचरा जमा, गौतमी देशपांडेनं व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 16:42 IST

coldplay कॉन्सर्टनंतर चाहत्यांनी डी.व्हाय. पाटील स्टेडियम परिसरात खूप कचरा केल्याचं समोर आलं.

सध्या सगळीकडे ब्रिटीश बँड 'कोल्डप्ले' ची सर्वत्र चर्चा रंगली आहे. १८, १९ व २१ जानेवारी असा तिन दिवस नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये बहुप्रतिक्षित 'coldplay' कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. coldplay बँडनं तब्बल ९ वर्षांनी भारतात परफॉर्म केलाय. त्यामुळे चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळाली. या कॉन्सर्टला मोठी गर्दी झाली होती. पण, कॉन्सर्टनंतर चाहत्यांनी डी.व्हाय. पाटील स्टेडियम परिसरात खूप कचरा केल्याचं समोर आलं. यावर मराठी अभिनेत्री गौतमी देशपांडेनं (Gautami Deshpande) संताप व्यक्त केलाय. 

'Cold Play' कॉन्सर्टला मोठी गर्दी झाली होती. पण, कोल्डप्लेच्या चाहत्यांनी डी.व्हाय. पाटील स्टेडियम परिसरात कचरा केला. चाहत्यांनी रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, कोल्ड ड्रिक्सचे कॅन, फूल आणि अन्य गोष्टी मोठ्या संख्येने फेकल्या होत्या. त्यामुळे जवळपास १०० टण कचरा जमा झाला.यावर गौतमी देशपांडेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. ज्यात तिनं कॉन्सर्टमध्ये सहभागी झालेल्या आणि कचरा करणाऱ्यांना खडेबोल सुनावले आहेत. 

गौतमीनं इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहलं, "आपल्या कृतीचे परिणाम आपल्याला खरोखरच कळत नाहीत का? प्लास्टिक हा सध्या आपला मुख्य शत्रू आहे! जरा शहाण्यासारखं वागूया का आपण?". तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आहेत. गौतमी देशपांडे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती आपल्या अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करते, तसेच सामाजिक विषयांवर ठामपणे मत मांडताना पाहायला मिळते. 

 'Cold Play' बँड विषयी...

 'Cold Play' हा एक ग्रॅमी अवॉर्ड विजेचा ब्रिटीश रॉक बँड आहे. या बँडचे जगभरात चाहते आहेत. जगातील सध्याचा सर्वात प्रभावशाली आणि यशस्वी बँड म्हणून कोल्डप्लेची ओळख आहे. या बँडची स्थापना १९९७ मध्ये करण्यात आली होती.या बँडमध्ये पाच सदस्यांचा समावेश आहे. या बँडला इतर अनेक पुरस्कारांसह संगीत श्रेत्रात मानाचा मानला जाणारा ग्रॅमी अवॉर्ड देखील मिळाला आहे. युट्यूबवर यांच्या गाण्यांना कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत.  

टॅग्स :गौतमी देशपांडेकचरा प्रश्नमुंबई