Join us

"सर्व पुरुष वर्गाला विनंती आहे की..." गौतमी पाटीलचं मोठं वक्तव्य, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल म्हणाली…

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2024 2:36 PM

प्रत्येकाच्या मनात घर करणारी गौतमी पाटील आज तरूणाच्या गळ्यातील ताईत बनली आहे. गावोगावी तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी असते.

Gautami Patil : गौतमी पाटील उत्तम नृत्यांगना आहे.  प्रत्येकाच्या मनात घर करणारी गौतमी पाटील आज तरूणाच्या गळ्यातील ताईत बनली आहे. गावोगावी तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी असते. आजच्या घडीला ती एक नामांकित सेलिब्रिटी बनली आहे. नुकतंच मनसेचे अमरावती जिल्हाध्यक्ष राज पाटील यांच्याकडून  अचलपूरमध्ये भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला गौतमी पाटील हिच्या लावणीचा कार्यक्रम खास आयोजित केला होता. यावेळी माध्यमांशी बोलताना गौतमीनं  महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. 

गौतमीच्या कार्यक्रमाला चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कार्यक्रम उरकल्यानंतर तिनं माध्यमांशी संवाद साधला.  तिला विचारण्यात आलं की, गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातमहिला अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. तर तरुण-तरुणींना तुम्ही काय सल्ला देशील? यावर गौतमी म्हणाली,  "प्रत्येकाच्या घरात आई, मुलगी बहिण आहे. तर कृपया ज्याच्यावर येतं त्यालाच कळतं. प्रत्येकाच्या घराचा विचार करा".

पुढे ती म्हणाली, "या गोष्टी मी पाहिल्या आहेत. म्हणून माझी सर्व पुरुषांना विनंती आहे की, अशा काहीही चुका करु नका की एखाद्या घराला खूप मोठा तडा जाईल आणि घर उद्धवस्त होईल. लहान मुलींच्या पालकांनी व्यवस्थित काळजी घ्या. आपली मुलगी कुठे जाते, काय करते, याकडे लक्ष राहू द्या आणि सुरक्षित राहा". सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गौतमी पाटील हिची चर्चा रंगली आहे.

गौतमीने आपल्या नजाकतीने प्रेक्षकांना भुरळ घालण्यात यश मिळवले. आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये गौतमी तिची नृत्यशैली सादर करते. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. सोशल मीडियावर गौतमी नेहमीच सक्रिय असते. या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते. 

टॅग्स :गौतमी पाटीलमहिलामहाराष्ट्रमराठी