Join us

गौतमीच्या नावाची क्रेझ काही वेगळीच; नृत्य कार्यक्रमात चक्क सापचं शिरला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2023 7:27 PM

गावखेड्यातच नव्हे तर मुंबईसारख्या झगमगाटी दुनियेच्या शहरातही गौतमीची क्रेझ कायम असल्याचं दिसून आलं.

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना नेहमीच अलोट गर्दी दिसून येते. तिच्या कार्यक्रमाला तरुणांसह वृद्ध महिला यांची झुंबड उडत असते. तिचे राज्यभरात कार्यक्रम हिट होतात. गावखेड्यातच नव्हे तर मुंबईसारख्या झगमगाटी दुनियेच्या शहरातही गौतमीची क्रेझ कायम असल्याचं दिसून आलं. अनेकदा गौतमीच्या कार्यक्रमात राडा होतो. हुल्लडबाजांना आवरण्यासाठी पोलिसांचा लाठीचार्ज करावा लागला. त्यामुळे उपस्थित प्रेक्षकांची मात्र एकच पळापळ होते. असाच काहीसा प्रकार मुंबईत घडला आहे. पण, यावेळी हुल्लडबाज नाही तर चक्क सापचं गौतमीच्या कार्यक्रमात शिरला. 

मुंबईतील कामोठे मानसरोवर रेल्वे स्थानकाजवळ गौतमीच्या नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कार्यक्रमात साप शिरला. मात्र, एका सर्पमित्रानं तो साप पकडला आणि त्‍याला जीवदान देत सुरक्षित ठिकाणी सोडला. हा साप पकडल्यानं मोठा अनर्थ टळलाय. 

अजित पवार गटाचे नेते पक्षाचे राज्याचे संघटक सचिव राजकुमार पाटील यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं गौतमीच्या नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं.  राजकुमार पाटील मित्र परिवाराकडून आयोजित या कार्यक्रमाला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. गौतमीला पाहण्यासाठी चाहते कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीच आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी गौतमीची क्रेझ दिसून आली. 

यापुर्वी नागपुरात गणेशोत्सवाच्या निमित्ताने गौतमीचा लावणी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमात काही हुल्लडबाजांनी गोंधळ घातला होता. प्रचंड गर्दी झाल्याने रेटारेटी सुरू झाली व बॅरिकेड्स काढण्याचा प्रयत्न झाला. काही युवकांनी खुर्च्यांची तोडफोड केली आणि खुर्च्यांचे तुकडे हवेत भिरकावले होते. यावेळी  परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला होता. श्चर्याची बाब म्हणजे माजी आमदारांच्या मार्गदर्शनातच संबंधित गणेशोत्सवाचे आयोजन होते.

टॅग्स :गौतमी पाटीलसेलिब्रिटीमुंबई