Join us  

सबसे कातिल...! गौतमीच्या डान्सनं 'मार्केट जाम', पाहा घायाळ करणाऱ्या अदा, Video

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2024 7:19 PM

गौतमी पाटील ही तिच्या अदांनी आणि नृत्यांनी चाहत्यांना घायाळ करत असते.

Gautami Patil Dance: सबसे कातिल गौतमी पाटील... तरूणाईला आपल्या तालावर नाचवणारी गौतमी अप्रतिम नृत्यशैली सादर करून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली. प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील ही तिच्या अदांनी आणि नृत्यांनी चाहत्यांना घायाळ करत असते. आपल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये गौतमी तिची नृत्यशैली सादर करते. (Gautami Patil Dance Video) आजच्या घडीला ती एक नामांकित सेलिब्रिटी बनली आहे. ग्रामीण भागात तिची क्रेझ भलतीच वाढल्याचे दिसते. ती चित्रपटांमध्ये देखील काम करत आहे. नेहमी नवनवीन फोटो, व्हिडीओ पोस्ट करून ती तिच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असते. (Gautami Patil Photo)

आता गौतमी पाटीलने एक भारी डान्स केला असून त्याच्यावर चाहत्यांनी कमेंटच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव केला आहे. आताच्या घडीला लोकप्रियतेच्या बाबतीत गौतमी पाटील कोणत्याही अभिनेत्रीपेक्षा कमी नाही. गौतमीने 'माझा कारभार सोपा नसतोय रं', 'दिलाचं पाखरू', 'सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम', 'पाटलांचा बैलगाडा' या गाण्यांवर केलेला डान्स प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेली गौतमी आज प्रेक्षकांच्या गळ्यातली ताईत बनली आहे. 

दरम्यान, विभत्स हावभाव तसेच आपल्या नजाकतीने प्रेक्षकांना भुरळ घालण्यात गौतमीने यश मिळवले. तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात. सोशल मीडियावर गौतमी नेहमीच सक्रिय असते. या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते. 

टॅग्स :गौतमी पाटीलसोशल व्हायरल