Join us

खबरदार गायत्री दातारच्या फोटोंवर कमेंट कराल तर,चांगलेच पडेल महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2021 7:32 PM

चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडिया चांगले माध्यम आहे. गायत्री दातारही सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते.

'तुला पाहते रे' मालिकेतून गायत्री दातार घराघरात लोकप्रिय झाली. मालिका संपल्यानंतर सध्या ती चला हवा येऊ द्या विनोदी कार्यक्रमात झळकत आहे.सध्या सोशल मीडियाचा जमाना आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडिया चांगले माध्यम आहे. सोशल मीडियावरही बरीच सक्रिय आहे. आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते.सोशल मीडियावर अनेकदा नेटकरी सेलिब्रेटींना ट्रोल करत असतात. सध्या सेलिब्रेटींना ट्रोल करण्याचे प्रमाण वाढले आहे.  

 

अनेकदा विनाकारण काही युजर्स सेलिब्रेटींच्या फोटोंवर शिवीगाळ करताना दिसता. अशा प्रकारच्या आक्षेपार्ह कमेंट गायत्री दातारच्याही फोटोवर केल्या गेल्या. मात्र अशा युजर्सना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे म्हणत गायत्री दातार गप्प न राहता तिथेच युजर्सना चांगला धडा शिकवते. गायत्री ट्रोल करणा-या  युजरच्या कमेंटचा थेट स्क्रीन शॉट काढून तिच्या सोशल मीडियावर शेअर करते.  त्याबाबत माहिती देते. 

ज्या अकाऊंटवरून हे मेसेज आले असतात त्यांना रिपोर्ट करते. हे  पाहून अनेकजण त्या व्यक्तीचे अकाऊंट रिपोर्ट करतात. अकाऊंट बंदही होण्याची शक्यता असते. गेल्या काही दिवासंमध्ये असे प्रकार वाढले आहेत.अनेक सेलिब्रेटी अशा प्रकारचे शिवीगाळ करणारे कमेंट पाहून संताप व्यक्त करतात. वेळीच अशा व्यक्तींची तोंड बंद केली पाहिजेत. सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामांसाठी न करता विनाकारण टीका करण्यासाठी जास्त होत असल्याचे पाहायला मिळते. 

अर्थात यात सगळेच असे नाहीत. काही चागले युजर्सही असतात ज्यांना माझी एखादी गोष्ट आवडली नसेल. तर ते मला सांगतात. त्यानुसार मी स्वतःत बदल करण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे काही वाईट लोकांमुळे सगळेच वाईट असे नाही. कोरोना काळात सोशल मीडियावर गरजु लोकांच्या मदतीचे सशक्त माध्यम सोशल मीडियाच आहे. सोशल मीडियामुळे अनेकांना तातडीने मदत मिळाली आहे. त्यामुळे सोशल मीडियाचा योग्य वापर होणे गरजेचे आहे.

टॅग्स :गायत्री दातारचला हवा येऊ द्या