Join us

मुलींपेक्षा नाती सरस

By admin | Published: November 19, 2016 2:33 AM

श्रीदेवी, सैफ अली खान, शाहरुख खान यांची मुले बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाले आहेत.

प्राजक्ता चिटणीसश्रीदेवी, सैफ अली खान, शाहरुख खान यांची मुले बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या मुलांची चर्चा नेहमीच आपल्याला ऐकायला मिळते. यासोबतच काही कलाकारांची तिसरी पिढीदेखील सध्या चांगलीच चर्चेत आहे. विशेष म्हणजे या कलाकारांची मुले या झगमगत्या दुनियेपासून दूर राहिली आहेत. पण त्यांच्या नातवंडांना या जगाचे आकर्षण आहे. अशाच काही कलाकारांच्या नातवंडांविषयी जाणून घेऊया...>नव्या नवेली नंदाअमिताभ बच्चन यांची मोठी मुलगी श्वेता नंदाची मुलगी नव्या नवेली ही गेल्या काही महिन्यांपासून चांगलीच चर्चेत आहे. ती इन्स्टाग्रामवर नेहमीच तिचे हॉट फोटो अपलोड करत असते. अमिताभ यांची मुलगी श्वेता नेहमीच चित्रपटसृष्टीपासून दूर राहिली. पण नव्याचे सोशल नेटवर्किंगवरील फोटो पाहाता ती लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करणार अशी चर्चा आहे.>साक्षी चोप्रारामायण, विक्रम और बेताल यांसारख्या मालिकांचे निमार्ते रामानंद सागर यांची नात साक्षीचे नाव गेल्या काही दिवसांपासून गाजत आहे. साक्षीने पाश्चिमात्य संगीत शिकले असून ती एक चांगली गायिका आहे. तिच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर ती नेहमीच फोटो अपलोड करत असते. सध्या ती तिच्या अकाऊंटवर अनेक बिकनीमधील फोटो पोस्ट करत आहे. त्यामुळे साक्षी चोप्रा अचानक चर्चेत आली आहे. >निहारिका रायजादाओ.पी. नय्यर यांची नात निहारिका रायजादा ही तिच्या बोल्ड अंदाजामुळे ओळखली जाते. तिने आतापर्यंत अनेक हिंदी चित्रपटात छोट्या भूमिका साकारल्या आहेत. सिक्स मायनस फाईव्ह इज इक्वल टू टू या चित्रपटात ती प्रमुख भूमिकेतही झळकली होती. पण तिला म्हणावी तशी प्रसिद्धी अद्याप मिळालेली नाही.>सायशा सेहगलदिलीप कुमार यांना सख्खी नातंवंडे नाहीत. पण त्यांच्या भाचीची मुलगी सध्या बॉलिवुडमध्ये आपले प्रस्थ निर्माण करण्याचा प्रयत्न करतेय. त्यांची भाची शाहिनची सायशा ही मुलगी आहे. शाहिन कोणत्या चित्रपटात झळकली नसली तरी ती दरम्यानच्या काळात चांगलीच चर्चेत होती. ती सलमान खानची पूर्व प्रेयसी असल्याचे म्हटले जाते. सायशाने शिवाय आणि काही दाक्षिणात्य चित्रपटात काम केले आहे.