मराठी मनोरंजन विश्वातील अनेक सिनेमे सध्या चर्चेत आहेत. यावर्षी रिलीज झालेले अनेक मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. 'नाच गं घुमा', 'स्वरगंधर्व सुधीर फडके', 'सत्यशोधक', 'ही अनोखी गाठ' अशा अनेक सिनेमांना प्रेक्षकांनी चांगली प्रसिद्धी मिळाली. यावर्षी अशाच एका कौटुंबिक सिनेमाला प्रेक्षकांनी पसंती दिली. हा सिनेमा म्हणजे 'घरत गणपती'. ज्यांना 'घरत गणपती' थिएटरमध्ये बघता आला नाही त्यांना आता हा सिनेमा घरबसल्या बघण्याची संधी मिळणार आहे.
या ओटीटीवर रिलीज झालाय 'घरत गणपती'
'घरत गणपती' सिनेमाला प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळालं. माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर सिनेमा लोकांच्या पसंतीस उतरला. तरीही ज्यांना 'घरत गणपती' थिएटरमध्ये पाहता आला नाही त्यांना आता हा सिनेमा घरबसल्या बघता येणार आहे. 'घरत गणपती' सिनेमा प्राईम व्हिडीओवर रिलीज झालाय. परंतु सध्या हा सिनेमा मोफत उपलब्ध नाही. 'घरत गणपती' सिनेमा पाहण्यासाठी तुम्हाला १४९ रुपये मोजावे लागणार आहेत. सध्या तरी हा सिनेमा मोफत नसला तरीही काही दिवसांनी हा सिनेमा सर्वांना फ्रीमध्ये प्राइम व्हिडीओवर बघता येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
'घरत गणपती' सिनेमाविषयी
'घरत गणपती' हा सिनेमा २६ जुलैला थिएटरमध्ये रिलीज झाला होता. कोकणात घडणाऱ्या घरत कुटुंबाच्या गणेशोत्सवाची रंजक कथा या सिनेमात बघायला मिळाली. भूषण प्रधान आणि निकिता दत्ता या सिनेमात प्रमुख भूमिकेत होते. याशिवाय शुभांगी गोखले, अश्विनी भावे, अजिंक्य देव, संजय मोने अशा कलाकारांनीही सिनेमात विशेष भूमिका साकारल्या. गणेशोत्सवातच्या काळात कोकणातील घराघरात घडणारी कहाणी सिनेमात पाहायला मिळाली.