Join us

बाप रे! अभिनेता सोनू सूदची पत्नी आहे तब्बल एवढ्या कोटी संपत्तीची मालकीण,जाणून घ्या आकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 3:23 PM

लॉकडाऊन काळात गरजुंसाठी देवदूत ठरलेला सोनू सूदचे मदत कार्य अजूनही तसेच सुरु आहे. या कामामुळे त्यांचे सर्वत्रच कौतुक झाले

लॉकडाऊन काळात गरजुंसाठी देवदूत ठरलेला सोनू सूदचे मदत कार्य अजूनही तसेच सुरु आहे. या कामामुळे त्यांचे सर्वत्रच कौतुक झाले. जगभरात त्याचे चाहते निर्माण झाले. अभिनेता नाही तर गरीबांचा देवदूत म्हणून लोक त्याची पूजा अर्चा करतात. तेलंगणाच्या डुब्बा टांडा गावात तरी चक्क सोनू सूदचे मंदिरही गावक-यांनी बनवले आहे. रोज त्याची मनोभावे लोकं पूजा करतात. यानंतर वेगवेगळ्या कारणांमुळे सोनू सूद चर्चेत असतो. फिल्मी करिअरप्रमाणे खासगी आयुष्यातल्या घडामोडींचीही चर्चा रंगते.  

सोनू सूदच्या संपत्तीविषयी देखील चर्चा रंगत असतात. मध्यंतरी caknowledge.com ने याविषयीची माहिती समोर आणली होती. या वेबसाईटच्या वृत्तानुसार सोनू सूदकडे एकूण 130 कोटींची संपत्तीचा मालक असल्याचे म्हटले होते. सोनू सूद गेल्या 2 दशकांपासून बॉलिवूड काम करत आहे. त्यामुळे सिनेमा आणि ब्रँड अ‍ॅन्डॉर्समेंट ही त्याच्या उत्पन्नाचा एक प्रमुख साधन मानले जाते.

सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला सोनू सदूच्या पत्नीचेही फोटो पाहायला मिळतील. सोनू सूद याच्या पत्नीचे नाव सोनाली सूद आहे. सोनू नागपुरात शिकत असताना त्याची सोनालीशी भेट झाली होती. याचदरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी 1996मध्ये लग्न करत संसार थाटला. मुळात सोनू सूदच नाहीतर त्याची पत्नीदेखील कोट्यावधी संपत्तीची मालकीण असल्याचे बोलले जाते. सोनाली सूद बॉलिवूडमध्ये निर्माती म्हणून ओळखली जाते. शक्ती सागर प्रोडक्शन अंतर्गत तिने अनेक हिट सिनेमा बॉलिवूडला दिले आहेत.

सोनाली सूद दिसण्यातही फार सुंदर आहे. सौंदर्याच्या बाबतीत सोनाली इतर बॉलिवूड अभिनेत्रींनाही मागे टाकते. मुळात सिनेसृष्टीत यशस्वी निर्माती असली तरी तिला जास्त चर्चेत राहणे आवडत नाही. लाइमलाइटपासून दूरच राहणे ती पसंत करते. मध्यंतरी सोनू सूदमुळेच ती चर्चेत आली होती. दोघांचेही एकत्र फोटो समोर आल्यानंतर त्याच्या पत्नीवरच सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. 

सोनू सूदवर आर्थिक व्यवहारात 250 कोटी रुपयांची अनियमितता असल्याचा आरोप आहे. त्यामध्ये, चॅरिटीसाठी मिळालेले फंड आणि बोगस काँट्रॅक्ट यांचाही समावेश आहे. सोनूने ही देगणी संपूर्ण भारतात दिली आहे. सध्या, सातत्याने सोनू सूदच्या मालमत्तेवर छापेमारी करण्यात येत आहे. इन्कम टॅक्स विभागाने आत्तापर्यंत 28 जागांवर धाड टाकली आहे. त्यामध्ये, मुंबई, दिल्ली, लखनौ, कानपूर आणि गुरुग्राम यांचाही सहभाग आहे. सोनू सूदविरुद्ध करण्यात आलेली ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी चौकशी आहे.

टॅग्स :सोनू सूद