उत्तम अभिनयासह बोल्ड विचारांमुळे कायम चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे नीना गुप्ता (neena gupta). आजवरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये काम केलं. काही सिनेमांमध्ये मुख्य भूमिकाही साकारली. परंतु, तुला कधीच कोणी अभिनेत्री म्हणून घेणार नाही, असं अभिनेता गिरीश कर्नाड यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या वाक्यानंतर नीना गुप्ता हादरुन गेल्या होत्या. अलिकडेच त्यांनी हा प्रसंग सांगितलं.
नीना गुप्ता यांचं खासगी आयुष्य कायम गुंतागुंतीचं राहिलं आहे. त्यांना आयुष्यात आलेले हे सगळे अनुभव त्यांनी त्यांच्या पुस्तकातही लिहिले आहे. विशेष म्हणजे या पुस्तकात त्यांनी अनेक मोठे आणि गंभीर खुलासे केल्याचं पाहायला मिळतं. इतकंच नाही तर कोणत्याही कार्यक्रमात नीना गुप्ता बेधडकपणे त्यांच्या जीवनावर भाष्य करतात. त्यामुळेच त्यांनी गिरीश कर्नाड यांची एक आठवण शेअर केली आहे.
१९८२ मध्ये रिलीज झालेल्या 'साथ साथ' या सिनेमात नीना गुप्ता यांनी काम केलं होतं. त्यांचा हा सिनेमा त्याकाळी विशेष गाजला होता. परंतु, 'या सिनेमानंतर आता तुला कोणीही अभिनेत्री म्हणून काम देणार नाही', असं गिरीश कर्नाड यांनी थेट म्हटलं होतं. याविषयी नीना गुप्ता यांनी 'शारजा इंटरनॅशनल बुक फेअर'दरम्यान सांगितलं.
नेमकं काय म्हणाले होते गिरीश कर्नाड?
या सिनेमानंतर आता तुला कोणीही अभिनेत्री म्हणून घेणार नाही. कारण, विनोदी भूमिका जेव्हा तुम्ही करता त्यावेळी तुमच्या सिनेकरिअरला ब्रेक लागतो, असं गिरीश कर्नाड म्हणाले होते.
दरम्यान, या सिनेमानंतर नीना गुप्ता यांनी अनेक सिनेमांमध्ये वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या. अलिकडेच त्या 'लस्ट स्टोरीज २', 'मसाबा मसाबा' या सीरिजमध्ये आणि 'उंचाई', 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे', 'बधाई हो' या सिनेमांमध्ये झळकल्या आहेत.