Join us  

ग्लोबल सिटीझन फेस्टीव्हलमध्ये कलाकारांची धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2016 4:43 AM

मुंबईत होत असलेल्या ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलला बॉलिवुडमधील अनेक स्टार्स हजेरी लावणार आहेत.

मुंबईत होत असलेल्या ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलला बॉलिवुडमधील अनेक स्टार्स हजेरी लावणार आहेत. लोकमतच्या सहकार्याने हा भव्य उपक्रम राबवला जात आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि आमिर खान यांसारखे दिग्गज अभिनेते आपल्याला खूपच कमी वेळा एकत्र पाहायला मिळतात. या कार्यक्रमाच्या निमित्ताने ते तिघेही एकत्र येणार असून त्यांच्यासोबत बॉलिवुडमधील अनेक प्रसिद्ध कलाकार हजेरी लावणार आहेत. भारतात पहिल्यांदाच ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हल आयोजित केले जात असून हे फेस्टिव्हल 19 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. या कार्यक्रमात अनेक आंतरराष्ट्रीय कलावंतदेखील सहभागी होणार आहेत. जगविख्यात बँड कोल्ड प्ले या फेस्टिव्हलचा मुख्य आकर्षकबिंदू ठरला आहे. ए. आर. रहमान, फरहान अख्तर, रणवीर सिंग, करिना कपूर, श्रद्धा कपूर, दिया मिर्झा, अर्जित सिंग, आयुष्यमान खुराना, अर्जुन कपूर, मलायका अरोरा, परिणिती चोप्रा, मोनाली ठाकूर यांसारखी बॉलिवुडमधील प्रसिद्ध मंडळी या फेस्टिव्हलला उपस्थित राहाणार आहेत. भारतात ग्लोबल सिटीझन इंडिया या नावाने ही संस्था काम करत असून याद्वारे शिक्षण, लैंगिक समानता व स्वच्छता या विषयी जनजागृती निर्माण केली जाणार आहे. ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलमध्ये गीत, संगीतासह नृत्याविष्कार आणि शार्ट फिल्मस दाखवण्यात येतील.