सध्या सगळीकडे भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. सर्वत्र गणरायाचं आगमन झालं आहे. काल काहींनी त्यांच्या बाप्पाला आनंदात निरोपही दिला आहे. सर्वांचा लाडका अभिनेता रितेश देशमुख(Riteish Deshmukh)च्या घरीदेखील दीड दिवसाच्या बाप्पा विराजमान झाले होते. त्याच्या घरच्या बाप्पाचं काल विसर्जन झालं असून त्याने आता बाप्पाच्या तयारीपासून विसर्जनापर्यंतच्या पूर्ण प्रोसेसचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात तो मुलांना इको फ्रेंडली मूर्ती बनवताना दिसत आहे.
अभिनेता रितेश देशमुख याने इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. यात तो मुलांना शाडूच्या मातीची मूर्ती बनवायला शिकवतो आहे. त्यानंतर मुलांसोबत मुर्तीला रंगकाम करताना दिसत आहे. नंतर बनवलेल्या मुर्तीची स्थापना करून आरती केली आणि मग घरात एका भांड्यात पाण्यामध्ये बाप्पाचं विसर्जन केले.
व्हिडीओ शेअर करत रितेशने कॅप्शनमध्ये लिहिले की, गणपती बाप्पा मोरया!! घरच्या घरी इको फ्रेंडली गणपती बनवण्याचा देशमुख घरगुतीची प्रथा आणि आदरपूर्वक विसर्जन. मुलांनी स्वतःचा बाप्पा बनवला आणि प्रत्येक बाप्पा खास होता. खरंच बाप्पा किती गोड दिसतो! रितेशच्या व्हिडीओला चाहत्यांची पसंती मिळत आहे.
वर्कफ्रंटअभिनेता रितेश देशमुखचा विस्फोट हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत प्रिया बापट मुख्य भूमिकेत आहे. याशिवाय यंदा तो बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचं सूत्रसंचालन करतो आहे. त्याच्या भाऊच्या धक्क्यालाही प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. रितेशचे लय भारी होस्टिंग, सदस्यांची शाळा घेण्याची विशेष शैली आणि लयभारी अंदाज चाहत्यांना भावतो आहे. या सर्व गोष्टींमुळेच रितेश भाऊ छोट्या पडद्यावरील नॉन-फिक्शनचा किंग ठरला आहे. 'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाने रेकॉर्डब्रेक TVR मिळवत नवा विक्रम रचला आहे.