Join us

गॉड, सेक्स अँड ट्रुथ लघुपटाला मिळालेल्या प्रतिसादामुळे राम गोपाल वर्मा भारावला, केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2018 9:17 PM

बॉलिवूडमध्ये रामगोपाल वर्माच्या सत्या, कंपनी आणि 'सरकार'सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धुमाकूळ घातला.

नवी दिल्ली- बॉलिवूडमध्ये राम गोपाल वर्माच्या सत्या, कंपनी आणि 'सरकार'सारख्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धुमाकूळ घातला. राम गोपाल वर्मानं बॉलिवूडला खूप हिट चित्रपट दिलेत. अनेकदा तो वादातही सापडला. परंतु गेल्या काही दिवसांपासून त्याच्या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा गल्ला मिळत नाहीये. त्यामुळे अमेरिकी पॉर्न स्टार मिया मल्कोवाला घेऊन रामूनं एक लघुपट बनवला आहे.गॉड, सेक्स अँड ट्रुथ हा चित्रपट राम गोपाल वर्मानं 26 जानेवारीला ऑनलाइन प्रदर्शित केला होता. त्यानंतर या लघुपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. ट्विटरवर याबाबत रामगोपाल वर्मानं अनेक ट्विटस केले आहेत. तसेच फेसबुकवरही राम गोपाल वर्मानं यासंदर्भात पोस्ट लिहिली आहे. या लघुपटातील पॉर्न स्टार मिया मल्कोवा हिच्याविषयीसुद्धा रामगोपाल वर्मानं धक्कादायक खुलासे केले आहेत. मियाच्या नजरेत सेक्सला काय महत्त्व आहे, हे या लघुपटातून दाखवण्यात आलं आहे. मिया हिनं 2012मध्ये एडल्ट चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. तिनं पॉर्न इंडस्ट्रीमध्ये स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता लवकरच राम गोपाल वर्मा जीएसटी टू चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणार आहे.दिग्दर्शक रामगोपाल वर्माचा ‘गॉड, सेक्स अ‍ॅण्ड ट्रुथ’ हा चित्रपट वादाच्या भोव-यात सापडला होता. अमेरिकन पॉर्न स्टार मिया मालकोवा हिची भूमिका असलेला हा चित्रपट खूपच अश्लील असल्याचा ठपका ठेवत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून अश्लीलतेचा प्रसार केल्याप्रकरणी, राम गोपाल वर्माविरोधात आयटी अ‍ॅक्ट 2000 च्या कलम 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सामाजिक कार्यकर्त्या देवी आणि त्यांच्या सहका-यांनी याविषयी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सेंट्रल क्राइम स्टेशनमध्ये आरजीव्हीच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, राम गोपाल वर्माने या चित्रपटासंबंधी सोशल मीडियावर बरेचसे फोटो शेअर केले. मात्र यातील एक फोटो अश्लील असून, त्याचा समाजमनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचा मुद्या तक्रारीत उपस्थित केला होता.

टॅग्स :राम गोपाल वर्मा