Join us

"गोल गप्पा हो गई है ये तो", बेबोला पाहून चाहत्यांना बसला शॉक, उडवतायेत तिची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 12:32 PM

पूर्वीप्रमाणे हसत खेळत असणारी करिना कपूर खान आता एनर्जेटीक दिसत नाही.

पतौडी कुटूंबाची सून,सैफची बेगम ती म्हणजे करीना कपूर खान. गेल्या काही दिवसांपासून चाहत्यांच्या हिटलिस्टवर आहे. आधी सितामाताच्या भूमिकेसाठी चाहत्यांनी करिनाचा प्रचंड विरोध केला. सोशल मीडियावर दिवसेंदिवस तिला ट्रोल करण्याचे प्रमाणही वाढले आहे. दुस-या बाळाच्या जन्मानंतर करिना कपूर खानची अवस्था पाहून नेटीझन्स अनेकदा तिच्यावर कमेंट्स करत तिला ट्रोल करताना दिसतात. पुन्हा एकदा करिना ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. यावेळी तिच्या लूकमुळे तिला प्रचंड ट्रोल केले जात आहे. निस्तेज त्वचा, सुचलेला चेहरा पाहून चाहते तिची खिल्ली उडवत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही युजर्सना तिचा हा लूक अजिबात आवडलेला नाहीय तर काहींना ती अशा लूकमध्येही सुंदरच दिसत असल्याचे वाटतंय. 

करिना कशीही दिसो ती सुंदरच म्हणत चाहते तिचे कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे युजर्स गोलपप्पा दिसतेय म्हणत तिची खिल्ली उडवत असल्याचे पाहायला मिळत आहे. करिनाचा हा फोटो सोशल मीडियावर येताच काहींनी तर आश्चर्य व्यक्त केले आहे. करिनाचा हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. स्लिम ट्रिम त्यात झिरो फिगर असलेली बेबो म्हणजे करिना कपूर खानला नेमकं झालंय तरी काय असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडल्याचे पाहायला मिळत आहे. एरव्ही प्रत्येक फोटोंवर वाहवा मिळवणारी बेबो आता तिच्या प्रत्येक फोटोंमुळे नेटीझन्सच्या निशाण्यावर असते. 

पूर्वी विनामेकअपमध्येही करिना फार सुंदर आणि तितकी ग्लॅमरस दिसायची.मात्र आता दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर करिनाच्या लूकमध्येही फार फरक पडल्याचे दिसते.नॅचरल ब्युटी म्हणून ओळखली जाणारी करिना आता पूर्वीप्रमाणे जास्त सुंदर दिसत नाही.पूर्वीप्रमाणे हसत खेळत असणारी करिना आता एनर्जेटीक दिसत नाही.करिनाला ट्रोल करण्याची ही काय पहिलीच वेळ नाही तर याआधीही तिला अशाच प्रकारे ट्रोल करण्यात आले होते. 'तू आता म्हातारी झाली आहेस', 'आता तरी डाएट करणं बंद कर' असं म्हणत तिला ट्रोल करण्यात आले होते.

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान