होणार सून मी या घरची या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan). चेहऱ्यावर सुंदर हास्य आणि अभिनयामुळे तेजश्री कायमच चर्चेत असते. तिने ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेत जान्हवी ही व्यक्तिरेखा साकारली होती. तिच्या या मालिकेतील भूमिकेचे आजही कौतुक केले जाते. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान नुकतेच तिने सोशल मीडियावर चाहत्यांना खुशखबर दिली आहे. ती लवकरच छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या संदर्भात तिने व्हिडीओ शेअर करत ही माहिती दिली.
तेजश्री प्रधान व्हिडीओत सांगताना दिसतेय की, आपली मराठी परंपरा मराठी प्रवाह… येस, बरोबर ओळखलं. मी येतेय आपल्या स्टार प्रवाहच्या नव्या कोऱ्या मालिकेतून खास तुमच्या भेटीसाठी… आता मालिकेचे नाव, तारीख, वेळ ही सगळी उत्सुकता पूर्ण होणार आहे. आमच्या नव्याकोऱ्या प्रोमोमधून. पण त्यासाठी तुम्ही पाहत राहा, आपले स्टार प्रवाह.
तेजश्री प्रधानच्या या व्हिडीओ चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. अपूर्वा नेमळेकरने या व्हिडीओवर कमेंट केली की, ये हुई ना बात, अभिनंदन. एका युजरने लिहिले की, तेजश्री नेहमी वेगवेगळे विषय हाताळत असते,बघूया यावेळी कोणतं नवीन कथानक आहे.. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, याचीच तर वाट बघत होतो आम्ही. आणखी एका युजरने लिहिले की, खूप आनंद झाला तू मालिकेतून भेटायला येती आहे मी खूप वाट बघत तुझी मालिका कधी येते आहे. लव्ह यू लॉट.