Join us

सुनीता आहुजाशी विवाहित असूनही 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता गोविंदा, करायचं होतं लग्न पण…

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 12:57 IST

एवढंच काय तर अभिनेत्रीबद्दल असलेलं प्रेमही गोविंदान उघडपणे व्यक्त केलं होतं.

अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता यांच्या लग्नाला ३७ वर्षे झाली आहेत. सुनीता आहुजा फक्त १८ वर्षांची असताना तिने ११ मार्च १९८७  गोविंदाशी लग्न केलं होतं. तेव्हा गोविंदा सिनेसृष्टीत यशस्वी झाला नव्हता. त्यामुळे या जोडप्याने त्यांचे लग्न लोकांपासून लपवून ठेवले होते. गोविंदाचे लग्न झालं होतं. पण तरीही तो एका अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता. एवढंच काय तर अभिनेत्रीबद्दल असलेलं प्रेमही त्यानं उघडपणे व्यक्त केलं होतं. तर जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री, जी अजूनही गोविंदाच्या हृदयात आहे.

गोविंदाचं जिच्यावर प्रेम होतं ती अभिनेत्री होती दिव्या भारती. सुनीता आहुजाशी विवाहित असूनही गोविंदाचं दिव्यावर प्रेम जडलं होतं.  दिव्या भारती ही ९० च्या दशकातील सर्वात यशस्वी आणि प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होती. पण, लहान वयातच तिच्या निधनाने सर्वांना धक्का बसला होता. 'शोला और शबनम'दरम्यान दिव्या आणि गोविंदा यांच्यातील नात्याबद्दल अफवा पसरल्या होत्या. एवढेच नाही तर गोविंदाने एका मुलाखतीमध्ये पुन्हा लग्न करण्याची शक्यताही नाकारली नाही. तो म्हणाला होता, "उद्या, कोण जाणे, मी पुन्हा लग्न करू शकतो.. पण सुनीताने यासाठी तयार असले पाहिजे. तरच मला मोकळे वाटेल. आणि माझ्या कुंडलीत दुसऱ्या लग्नाची शक्यता आहे".

 गोविंदाने दिव्या भारतीबद्दल म्हणाला होता, "मला नशिबावर विश्वास आहे. जे व्हायचं ते होईल. होय, मला जुही खूप आवडते आणि दिव्याही. दिव्या खूप सुंदर आहे. मला माहितेय की जेव्हा माझी पत्नी सुनीताला हे सर्व कळेल तेव्हा तिला खूप वाईट वाटेल. पण मी दिव्याच्या सौंदर्यावरून माझे लक्ष हटवू शकत नाहीये". मात्र, गोविंदाचे दिव्यासोबत कधी संबंध होते की नाही याची पुष्टी होऊ शकली नाही.  तसेच दिव्या भारतीकडून गोविंदासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे कोणतेही संकेत मिळाले नव्हते.

टॅग्स :गोविंदाबॉलिवूडसेलिब्रिटीदिव्या भारती