Join us

भाचा कृष्णासोबतच्या वादावर गोविंदाने पहिल्यांदाच सोडलं मौन, म्हणाला - 'त्याचे सर्व आरोप खोटे आहेत'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 9:29 AM

आता या वादावर पहिल्यांदाच गोविंदाने मौन सोडलं आहे. त्याने कृष्णाचा प्रत्येक आरोप फेटाळून लावला आणि त्यावर सडेतोड उत्तर दिलं आहे.

कॉमेडीअन कृष्णा अभिषेक आणि गोविंदा यांच्यातील वादाची सध्या चर्चा सुरू आहे. जेव्हा गोविंदा, कपिल शर्माच्या शोमध्ये आला होता तेव्हा कृष्णाने या एपिसोडमध्ये काम करण्यास नकार दिला होता. नंतर एका मुलाखतीत कृष्णा म्हणाला होता की, तो गोविंदा समोर परफॉर्म करू शकत नव्हता. त्याला गोविंदासमोर कॉमेडी करण्याची समस्या होती. तेच कृष्णाने याचं दु:खं व्यक्त केलं की, गोविंदा त्याच्या जुळ्या मुलांना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्येही आला नव्हता.

आता या वादावर पहिल्यांदाच गोविंदाने मौन सोडलं आहे. त्याने कृष्णाचा प्रत्येक आरोप फेटाळून लावला आणि त्यावर सडेतोड उत्तर दिलं आहे. गोविंदाने कृष्णाचे सगळे आरोप खोटे असल्याचं म्हटलं आहे. एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत गोविंदाने या वादावर विस्ताराने भाष्य केलं. तो म्हणाला की, कृष्णाची अनेक विधाने त्याची प्रतिमा खराब करणारे आहेत. (मामा गोविंदासोबत शूट न करण्यावर बोलला कृष्णा, म्हणाला - समोर गेलो असतो तर....)

तेच कृष्णाच्या मुलांना भेटण्याच्या गोष्टीबाबत गोविंदाने मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला की, जेव्हा कृष्णाचे जुळी मुलं हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा मी परिवारासोबत त्यांना भेटायला गेलो होतो. पण तिथे असलेल्या नर्सने मला सांगितलं की, कश्मीराची इच्छा नाही की, माझ्या परिवारातील कोणत्याही सदस्याने त्यांना भेटावं.

गोविंदा पुढे म्हणाला की, मी आग्रह केल्यावर दुसऱ्याच दिवशी आम्हाला दूरून मुलांना बघण्याची संधी मिळाली होती. यानंतर आम्ही जड मनाने तेथून निघून गेलो. गोविंदानुसार, कृष्णाला याबाबत काहीच माहीत नाही.

गोविंदाने याबाबत दु:खं व्यक्त केलं की, कृष्णाने मीडियासमोर वादग्रस्त वक्तव्ये केली. तो त्याच्या विरोधात खूपकाही बोलला होता. यावर गोविंदा म्हणाला की, कृष्णा आणि कश्मीरा सतत माझ्या विरोधात वक्तव्य करत आहेत. मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. असं करून त्यांना काय मिळणार आहे.

कृष्णासोबतच्या आपल्या रिलेशनबाबत गोविंदा म्हणाला की, आता त्याला त्याच्या परिवारासोबत एक मर्यादित अंतर ठेवायचं आहे. त्याला याचं दु:खं आहे की, परिवारातील मुद्दे मीडियात बोलले गेले. 

टॅग्स :गोविंदाकृष्णा अभिषेकटेलिव्हिजनबॉलिवूड