जगभरात संगीत क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठित समजल्या जाणारा ग्रॅमी पुरस्कार सोहळा लॉस एंजेलिसमध्ये पार पडला. या सोहळ्यांत ‘धीस इज अमेरिका’ या गाण्याला ‘सॉन्ग ऑफ द ईअर’ म्हणून निवडले गेले. तर लेडी गागा हिच्या ‘व्हेअर डू यू थिंग यू आर गोइंग’ या गाण्याने बेस्ट पॉप परफॉर्मन्स श्रेणीत बाजी मारली. बेस्ट पॉप ड्युओ/ ग्रूप परफॉर्मन्स श्रेणीतही लेडी गागाने बाजी मारली. ब्रेडली कूपरसोबतच्या तिच्या ‘शैलो’ गाण्याला बेस्ट ड्युओ परफॉर्मेंस आणि रिकॉर्ड ऑफ द ईयर अवॉर्ड पुरस्काराने गौरविण्यात आले.सॉन्ग ऑफ द ईअर ठरलेले ‘धीस इज अमेरिका’ हे गाणे डोनाल्ड ग्लोवरने गायले असून चाईल्डिश गैंबिनोने लिहिले आहे.
ग्रॅमी पुरस्कार हा अमेरिका देशामधील नॅशनल ॲकॅडमी ऑफ रेकॉर्डिंग आर्ट्स ॲन्ड सायन्स संस्थेतर्फे दिला जाणारा एक वार्षिक पुरस्कार आहे. ग्रॅमी पुरस्कार संगीतातील त्या वर्षीच्या सर्वोत्तम योगदानासाठी दिला जातो. पहिला ग्रॅमी पुरस्कार वितरण सोहळा ४ मे १९५९ रोजी अमेरिकेच्या लॉस एंजेलिस व न्यूयॉर्क या शहरांमध्ये साजरा झाला. तेव्हापासून दरवर्षी ग्रॅमी पुरस्कार आयोजित केले जात आहेत. २००४पासून हा सोहळा लॉस एंजेलिसच्या स्टेपल्स सेंटरमध्ये भरवला जातो.
ग्रॅमी अवार्डवर नाव कोरणा-या अन्य विजेत्यांची नावे खालीलप्रमाणे...
सॉन्ग ऑफ द ईअरधीस इज अमेरिका (डोनाल्ड ग्लोवर, लुडविग गोरान्सन, जेफरी लमार विलियम्स)
बेस्ट सोलो परफॉर्मन्सवेअर डू यू थिंक यू आर गोर्इंग (लेडी गागा)
बेस्ट पॉप ड्युओ/ ग्रूप परफॉर्मन्सशैलो (लेडी गागा, ब्रेडली कपूर)
बेस्ट रॉक परफॉर्मन्सवेन बैंड गोज गुड (क्रिस कॉर्नेल)
बेस्ट रॉक सॉन्गमासएज्युकेशन (सेंट विनसेंट)
बेस्ट ट्रॅडिशनल पॉप व्होकल अल्बममाय वे (विली नेल्सन)
बेस्ट पॉप व्होकल अल्बमस्वीटनर (एरियाना ग्रांडे)
बेस्ट मेटस परफॉर्मन्सइलेक्ट्रिस मलीहा (हाय आॅन फायर)
बेस्ट डान्स/ इलेक्ट्रीक अल्बमवुमेन वर्ल्डवाईड (जस्टिस)
बेस्ट कंटेंपरेरी इंस्ट्रूमेंटल अल्बमस्टीव गैड बैंड (स्टीव्ह गैड बैंड)