- Suvarna Jain -सण आनंदाचा, सण उत्साहाचा, सण जल्लोषाचा आणि नव्या संकल्पांचा म्हणजेच गुढीपाडवा. मराठी नववर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. थर्टी फर्स्टला इंग्रजी नववर्षाची दणक्यात सुरुवात होत असली, तरी मराठी नववर्षाची सुरुवातसुद्धा त्याहून दणक्यात व्हावी यासाठी सारेच सज्ज झाले आहेत. गुढीपाडवा हा सण केवळ नववर्षाची सुरुवात एवढ्यापुरता मर्यादित नाही. हा सण आहे नात्यांचा जल्लोष करण्याचा, एकमेकांप्रती असलेलं प्रेम, आदर व्यक्त करण्याचा आणि एकमेकांप्रती असलेला विश्वास दृढ करण्याचा. त्यामुळे मराठी सणांमध्ये गुढीपाडवा या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुढीपाडवा दणक्यात साजरा करण्यासाठी सारेच सज्ज झाले आहेत. नवे संकल्प, नवी सुरुवात यामुळे सामान्यांसह मराठी कलाकार मंडळींच्या जीवनातही गुढीपाडव्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने काही मराठी कलाकारांच्या भावना जाणून घेण्याचा केलेला हा प्रयत्न.स्नेहा वाघमराठी दिनदर्शिकेतील सगळ्यात महत्त्वाचा आणि पवित्र सण म्हणजे गुढीपाडवा. नव्या गोष्टी आणि नव्या संकल्पांचा शुभारंभ या दिवशी केला जातो. त्यामुळे माझ्यासाठी यंदाचा गुढीपाडवा थोडा खास आहे. छोट्या पडद्यावर दीड वर्षानंतर परतण्यासाठी यापेक्षा उत्तम क्षण कोणता असूच शकत नाही, असे मला वाटते. शेर-ए-पंजाब महाराजा रणजितसिंग या मालिकेतून छोट्या पडद्यावर मी परतत आहे. त्यामुळे कलाकार म्हणून माझ्या आयुष्याची ही नवी सुरुवात असून, इथूनच माझ्या अभिनयाचा नवा अध्याय सुरू होत आहे. यंदाचा गुढीपाडवा या मालिकेच्या सेटवर माझ्या सहकलाकारांसोबत साजरा करणार आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईपासून तीन तासांच्या अंतरावर असलेल्या आमगावमध्ये उभारण्यात आलेल्या मालिकेच्या भव्य सेटवर आम्ही शूटिंगमध्ये व्यस्त आहोत. असं असतानाही गुढीपाडवा दणक्यात साजरा करण्याचा आम्ही ठरवलं आहे. इतकंच नाही, तर पारंपरिक वेशभूषा करून सेटवर येण्याचं आम्ही ठरवलं आहे. सेटवर मी एकमेव मराठी मुलगी असल्याने वेळ मिळाला, तर माझ्या सहकाऱ्यांसाठी गुढीपाडव्यानिमित्त गोडधोड आणि मिठाई स्वत: बनवून नेण्याचं मी ठरवलं आहे.नेहा पेंडसेगुढीपाडवा साजरा करणं मला खूप आवडतं. एकतर मराठी नववर्षाची सुरुवात या दिवसापासून होते आणि वाईट गोष्टींवर ं मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणजे गुढीपाडवा. मला माझ्या कुटुंबीयांसोबत गुढीपाडवा साजरा करायला आवडतो. त्यामुळे यादिवशी मी मे आय कम इन मॅडम ? मालिकेच्या शूटिंगमधून सुट्टी घेऊन घरीच साजरा करणार आहे. या दिवशी मी आणि माझी आई पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीने नटून थटून तयार होतो आणि माझे बाबा गुढी उभारून पूजा करतात. या दिवशी खाण्याचीही रेलचेल असते. गुढीपाडव्यासाठी आम्ही खास गोडधोड जेवण आणि मिठाई बनवतो. याशिवाय श्रीखंड-पुरी, ड्रायफ्रुट टाकून बनवलेली विशेष खीर हा गुढीपाडव्याचा खास बेत असतो. माझ्या सगळ्या चाहत्यांना, रसिकांना आणि वाचकांना गुढीपाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा.
श्वेता महाडिकसध्या नागरिकांना आपल्या परंपरा, सण, संस्कृती याचा विसर पडत चालला आहे; मात्र याच गोष्टी टिकून राहाव्यात आणि त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणंही गरजेचं असते. त्यामुळेच प्रत्येक सण मी उत्साहात आणि आनंदात साजरा करते. कारण, त्यानिमित्ताने माझ्या मुलाला या प्रत्येक सणाचं महत्त्व कळते. सध्या मी कृष्णदासी या मालिकेत बिझी आहे. खास या दिवशी माझा सगळा वेळ मी माझ्या कुटुंबासाठी राखून ठेवणार आहे. माझ्या कुटुंबासह हा सण साजरा करते. गुढीपाडव्यासाठी मी खास पुरण-पोळीचा बेत करते. गुढीपाडवा, नऊवारी साडी आणि महाराष्ट्रीयन नथ हे जणू काही समीकरणच. त्यामुळे या दिवशी मी पारंपरिक पद्धतीने तयार होऊन हा सण साजरा करते. फिटनेसच्या दृष्टीने यंदा माझ्या पतीला आणि मुलाला सायकल खरेदी करून देण्याचं मी ठरवलं आहे.अक्षय म्हात्रेया दिवशी सकाळी पाच वाजता उठून, अंघोळ करून तयार असतो. त्याचवेळी माझे बाबा गुढी उभारून तिच्या पूजनाची तयारी करीत असतात. आई स्वयंपाक घरात गोडधोड लज्जतदार जेवण बनवण्यात व्यस्त असते. गुढीपाडव्याच्या दिवशी ढोल-ताशांच्या तालावर निघणारी शोभायात्रा, यातील पारंपरिक महाराष्ट्रीयन नऊवारी परिधान करून नटलेल्या आणि आसंमतात पसरलेला आनंद हे सारं सारं मला खूप भावतं. त्यानंतर संध्याकाळी कुटुंबासमवेत एकत्र येत रात्रीच्या जेवणाचा आनंद घेतो. सध्या पिया अलबेला हि मालिका मी करत असल्यामुळे घरी आणि सेटवर दोन्ही ठिकाणी मी सेलिब्रेशन करणार आहे. सगळ््यांना मराठी नववर्ष साऱ्यांना सुख-समाधानाचे, आनंदाचे आणि भरभराटीचे जावो या मन:पूर्वक शुभेच्छा. मंदार चांदवलकरमी दर वर्षी न चुकता पत्नीसोबत आणि मुलासोबत हा सण साजरा करतो. या दिवशी माझी पत्नी घरी गुढी उभा करते आणि आम्ही त्याची पूजा करतो. गुढीपाडवा म्हटले की, एखादी नवीन गोष्ट खरेदी करायची आपल्याकडे प्रथा आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा च्या शूटिंगमध्ये मी सध्या व्यग्र आहे.