Join us

Song Out : रणवीर सिंग विचारतोय, क्यों ये दूरी और मजबुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2019 6:29 PM

अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याचा आगामी 'गली बॉय' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला.

ठळक मुद्दे रणवीर स्ट्रिट रॅपर डिवाईन व नैजीची स्टोरी सांगणार गली बॉय सिनेमात रणवीरने घेतली प्रचंड मेहनत

अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याचा आगामी 'गली बॉय' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. आता या चित्रपटातील आणखीन एक गाणे रिलीज झाले. 'कोई मुझको यु बताए, क्यों ये दूरी और मजबुरी' असे या गाण्याचे बोल आहेत. 

जोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर स्ट्रिट रॅपर डिवाईन व नैजीची स्टोरी सांगणार आहे. डिवाईन व नैजी हे दोघेही मुंबईच्या झोपडपट्टी राहिलेले आणि पुढे रॅपच्या दुनियेत धूम करणारी दोन नावे आहेत. अतिशय संघर्षाने डिवाइन व नैजीने आपली ओळख निर्माण केली. ‘गली बॉय’ हा चित्रपट मुख्यत: याच दोघांच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा आहे.२६ वर्षीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा सांगणाऱ्या या चित्रपटात रणवीर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने रणवीरमधील अभिनयाव्यतिरिक्तचे गुणही पाहायला मिळाले.  'दूरी' हे गाणे स्वत: रणवीरने गायले असून या गाण्यातून समाजातील विषमतेवर भाष्य करण्यात आले आहे. २ मिनीट ३१ सेकंदाचे हे गाणे रॅप प्रकारातले असून यामध्ये गरीब आणि या गरीबीशी संघर्ष करणाऱ्या व्यक्ती दाखविण्यात आल्या आहेत. ऋषी रिच यांचे म्युझिक असलेले हे गाणे जावेद अख्तर आणि डिव्हाईन यांनी शब्दबद्ध केले आहे. यापूर्वी ‘गली बॉय’मधील ‘असली हिप हॉप’ आणि ‘अपना टाईम आयेगा’ ही गाणी प्रदर्शित झाली आहेत.या गाण्याला रणवीरच्या चाहत्यांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

 

 ही भूमिका साकारण्यासाठी रणवीरने प्रचंड मेहनत घेतली. अगदी डिवाइन व नैजीसारख्या रॅपर्सकडून सुमारे १० महिने प्रशिक्षण घेतले. या चित्रपटाचे दिग्दर्शन जोया अख्तरने केले आहे. येत्या १४ फेब्रुवारीला म्हणजेच व्हॅलेन्टाईन डेच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच रणवीर व आलियाची जोडी स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. 

टॅग्स :गली ब्वॉयरणवीर सिंग