Join us

एकदा पाहाच,‘गली बॉय’ रणवीर सिंग, आलिया भट्टचा ‘टूडल्स’ व्हिडीओ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 11:36 IST

करण जोहरने रणवीर-आलिया आणि ‘गली बॉय’ची दिग्दर्शिका झोया अख्तरसोबत एक मजेदार टूडल्स व्हिडीओ बनवला आहे.

ठळक मुद्देरणवीरचा ‘गली बॉय’ हा चित्रपट येत्या १४ फेबु्रवारीला रिलीज होतोय. या चित्रपटात प्रथमच रणवीर व आलिया भट्टची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

आलिया भट्ट आणि रणवीर सिंगचा ‘गली बॉय’ लवकरच बॉक्सआॅफिसवर धडकणार आहे. येत्या व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी हा चित्रपट प्रदर्शित होतोय. तूर्तास या चित्रपटाची अख्खी टीम प्रमोशनमध्ये बिझी आहे. रणवीर व आलिया चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत. याचदरम्यान करण जोहरने रणवीर-आलिया आणि ‘गली बॉय’ची दिग्दर्शिका झोया अख्तरसोबत एक मजेदार टूडल्स व्हिडीओ बनवला आहे. या व्हिडीओत करण जोहर आलिया व रणवीरची चांगलीच फिरकी घेतोय. विशेष म्हणजे, या व्हिडिओत करणने एक विशेष खुलासाही केला आहे.

होय, ‘टूडल्स’ हा शब्द कुठून आला, हे त्याने सांगितलेय. ‘टूडल्स’ हा शब्द माझा नाही. तर झोया व आलिया हा शब्द वापरायच्या. मी हा शब्द त्यांच्याकडून चोरला, असे करणने सांगितले आहे. आलियाच्या ड्रेसवरही करणने मजेशीर कमेंट केली आहे. आलियाच्या ड्रेस अगदी कसाटा आईसस्क्रीमसारखा असल्याचे त्याने म्हटले. आहे ना मजेशीर...

रणवीरचा ‘गली बॉय’ हा चित्रपट येत्या १४ फेबु्रवारीला रिलीज होतोय. या चित्रपटात प्रथमच रणवीर व आलिया भट्टची जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. ‘गली बॉय’मध्ये रणवीर सिंग नावेद शेख(रॅपर नैजीचे खरे नाव नावेद शेख आहे) नामक युवकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी रणवीरने प्रचंड मेहनत घेतली. अगदी डिवाइन व नैजीसारख्या रॅपर्सकडून सुमारे १० महिने प्रशिक्षण घेतले. या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तरने केले आहे.

टॅग्स :गली ब्वॉयरणवीर सिंगआलिया भटकरण जोहर