Join us

'तारक मेहता...' फेम गुरुचरण सिंग दिल्ली एअरपोर्टवरुन बेपत्ता, वडिलांनी दाखल केली तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 5:28 PM

मालिकेत 'सोढी' या पंजाबी भूमिकेत तो झळकला होता.

'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashma) या लोकप्रिय विनोदी मालिकेत 'सोढी' ही पंजाबी  भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग (Gurucharan Singh) बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. अभिनेत्याच्या वडिलांना पोलिस स्थानकात मुलगा बेपत्ता झाल्याची तर्कार दाखल केली आहे. गुरुचरण सिंग शेवटचा दिल्ली विमानतळावर होता. तिथून तो फ्लाईटने मुंबईला परतणार होता. मात्र ना तो मुंबईत पोहोचला आणि ना घरी परत आला असं त्याच्या वडिलांचं म्हणणं आहे.

ई टाईम्सला वडिलांनी दाखल केलेलं तक्रारपत्र मिळालं असून त्यात नमूद करण्यात आलं आहे की, 'गुरुचरण सिंग वय वर्ष 50 हा 22 एप्रिल रोजी सकाळी 8.30 वाजता मुंबईची फ्लाईट पकडणार होता. पण तो मुंबईला पोहोचलाच नाही आणि घरीही आला नाही. त्याचं मोबाईलही संपर्कक्षेत्राच्या बाहेर आहे. त्याची मानसिक स्थिती स्थिर असून आम्ही त्याचा शोध घेतला. मात्र त्याच्याशी संपर्क होऊ न शकल्याने अखेर तक्रार दाखल केली.'

गुरुचरण सिंग यांना सगळेच तारक मेहता मालिकेतील सोढी नावानेच ओळखतात. 'ओ पापाजी'म्हणत सोढी नेहमीच जॉली मूडमध्ये असायचा. काही वर्षांपूर्वीच त्याने वडिलांच्या तब्येतीच्या कारणास्तव मालिका सोडली. इतर कलाकारांप्रमाणेच त्याच्याही पेमेंटचे इश्यू झाले. जेनिफर मिस्त्रीच्या वादावेळी गुरुचरणचेही पैसे परत मिळाले. 

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माबेपत्ता होणंसेलिब्रिटीदिल्लीमुंबईपोलीस ठाणे