Join us

गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 18:24 IST

'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम सोढी म्हणजेच गुरुचरण सिंग ७ दिवसांपासून बेपत्ता आहेत.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेतील रोशन सिंग सोढीच्या भूमिकेत दिसलेले अभिनेते गुरुचरण सिंग (Gurucharan Singh) देल्या ७ दिवसांपासून बेपत्ता आहेत. दिल्लीत आईवडिलांची भेट घेतल्यानंतर ते फ्लाईटने परत मुंबईला येणार होते. मात्र ना त्यांनी फ्लाईट पकडली आणि ना ते दिल्लीतील घरी परत गेले. त्यांच्या वडिलांनी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. त्यांच्या वडिलांची स्थिती ठिक नसल्याचं समोर आलं आहे. तसंच गुरुचरण लग्न करणार होते अशाही चर्चा आता पसरल्या आहेत. गुरुचरण सिंगच्या नातेवाईकांनी माध्यमांना महत्वाची माहिती दिली.

इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत गुरुचरण सिंग यांचे कुटुंबीय म्हणाले,  "आम्हाला त्याच्या लग्नाबाबतीत काहीच कल्पना नाही. या बातम्या कुठून येत आहेत आम्हाला माहित नाही. सध्या गुरुचरण यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत. गुरुचरणचाही अद्याप काहीच तपास लागलेला नाही."

गुरुचरण सिंग आर्थिक तंगीचा सामना करत होते असंही म्हटलं गेलं.  मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तसंच त्यांच्या लग्नाबाबतीतही काही स्पष्ट झालेले नाही. गुरुचरण सिंग यांचे शेवटचे लोकेशन दिल्ली घराजवळील पालम हेच होते. त्यांना एटीएममधून 7 हजार रुपये काढले होते. नंतर मात्र त्यांचं लोकेशन ट्रेसच झालं नाही. सध्या पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍माटिव्ही कलाकारबेपत्ता होणंपोलिस