बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार ( Akshay Kumar) आणि कतरिना कैफ यांचा ‘सूर्यवंशी’ (Sooryavanshi) हा सिनेमा काल देशभर प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद मिळाला. कोरोना महामारीनंतर चित्रपटगृहांत रिलीज होणारा हा पहिला मोठा सिनेमा आहे, साहजिकच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या अभिनयाचं कौतुक होतंय. अभिनेत्री हेलिन शास्त्री ( Haelyn Shastri) हिनेही या चित्रपटात अगदी छोटाशी भूमिका साकारलीये. तिचंही कौतुक होतंय आणि या कौतुकानं ती अक्षरश: भारावून गेली आहे. एक व्हिडीओ शेअर करत तिने ‘सूर्यवंशी’त काम करण्याचा अनुभव शेअर केला आणि हा अनुभव सांगताना तिला रडू कोसळलं.
एका मोठ्या सिनेमात भूमिका मिळण्याचा आनंद काय असतो, अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर करण्याचा आनंद किती मोठा असतो आणि त्याहीपेक्षा पाठीवर कौतुकाची थाप पडते तेव्हाचा आनंद काय असतो, याचं बोलकं उदाहरण म्हणजे हेलिनचा हा व्हिडीओ.व्हिडीओत ती म्हणते, ‘या चित्रपटात माझा रोल अगदीच छोटा होता. पण तुम्ही लोक माझं इतकं कौतुक करत आहात. मी का रडतेय, मला का रडायला येतंय माहित नाही. कदाचित हे आनंदाचे अश्रू आहेत. सूर्यवंश्ी हा सिनेमा माझ्यासाठी फक्त एक सिनेमा नाही तर एक भावना आहेत.’
कोण आहे हेलिन?हेलिनने ‘सूर्यवंशी’ चित्रपटात मालविका गुप्ताची भूमिका साकारली आहे. मालविका ही या एटीएस टीमचा भाग आहे. तर याच टीमचा प्रमुख डीसीपी वीर सूर्यवंशी म्हणजेच अक्षय कुमार आहे. यापूर्वी ‘अलिफ लैला’ या मालिकेत तिने राजकुमारी साराची भूमिका साकारली होती. ‘विघ्नहर्ता गणेश’ या मालिकेत तिने एका देवीची भूमिका साकारली होती. अनेक जाहिरातींमध्येही ती झळकली आहे.
पहिल्याच दिवशी इतक्या कोटींची कमाईलॉकडाऊननंतर चित्रपटगृहे उघडल्यानंतर प्रदर्शित होणारा ‘सूर्यवंशी’ पहिला मोठा चित्रपट आहे. उत्तर अमेरिका, यूएई, आॅस्ट्रेलिया, जपान आणि चीन सारख्या 66 देशांमध्ये 1300 स्क्रीन्सवर अक्षयचा हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे. हा एक विक्रम आहे. भारतात 4 हजार स्क्रीन्सवर तो रिलीज झाला आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, काल शुक्रवारी रिलीज झालेल्या ‘सूर्यवंशी’ पहिल्या दिवशी 26 कोटींचा बिझनेस केला. सुरूवातीला चित्रपटाला संथ प्रतिसाद मिळाला. पण नंतर प्रेक्षकांची गर्दी वाढली.