जणू सह्याद्रीचा कडा, श्वास रोखूनी खडा या कॅप्शनसह जेव्हा सर्वात पहिल्यांदा सरसेनापती हंबीरराव मोहिते या सिनेमाचे पोस्टर समोर आले तेव्हाच चाहत्यांना प्रवीण तरडेंच्या या सिनेमाची उत्सुकता लागली आहे. पण लॉकडाऊनमुळे रखडलेला हा सिनेमा अखेर चाहत्यांच्या भेटीस येत आहे. २७ मे रोजी हा सिनेमा आपल्या भेटीस येईल. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची शौर्यगाथा या सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे..
या सिनेमात प्रवीण तरडे स्वत: सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या भूमिकेत दिसतील.हा सिनेमा प्रवीण तरडेंसाठी खास आहे कारण या सिनेमात त्यांची खऱ्या आयुष्यातील पत्नी ही स्नेहल तरडे ही ऑनस्क्रीन देखील त्यांच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणारे आहे...होय, सिनेमात स्नेहल सौ.लक्ष्मीबाई बंदीरराव मोहिते यांची भूमिका साकारणारे आहे...पण या भूमिकेबद्दल बोलताना दिग्दर्शक आणि अभिनेता प्रवीण तरडे यांनी एक खंत व्यक्त केली आहे...दोन्ही छत्रपतींचे सरसेनापती असलेले हंबीरराव मोहिते यांच्या पत्नी आणि महाराणी ताराराणी यांच्या जन्मदात्री आई लक्ष्मीबाई मोहिते यांच्या नावाची इतिहासात नोंद नसल्याची खंत व्यक्त केली आहे...सिनेमाची तयारी करत असताना प्रवीण तरडे जेव्हा हंबीरराव मोहिते यांच्या पत्नीचं नाव शोधत होते. तेव्हा त्यांना काय अनुभव आला की इतिहासात हंबीरराव मोहिते यांच्या पत्नीच्या नावाची नोंदच नाही. तेव्हा ते एक इतिहासकार माझ्याशी तावातावने भांडले...छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज सर्वांना माहीत आहेत. त्यांच्या पत्नी म्हणजे महाराण्यांची नावं सर्वांना माहीत आहे. पण ज्या सरसेनापतींनी एवढी युद्ध जिंकली... त्यांची पत्नी आणि जिच्या पोटी ताराराणी जन्माला आल्या त्या माऊलीचं नावच इतिहासात नाही आहे.
इतिहासाने फक्त पुरुषांना मोठं केलं. पण ज्या माऊलीच्या पोटी त्यांनी जन्म घेतला त्यांना मात्र विसरले.हंबीरराव मोहिते यांच्या पत्नीच्या नावाचा संदर्भ सापडत नाही. पण सिनेमात हंबीररावांची पत्नी दाखवायची होती. त्यांचं कुटुंब दाखवायचं होतं. त्यांच्या नावाचा संदर्भ इतिहासात नसला तरी सिनेमासाठी ते अनिवर्य होतं. त्यामुळे मग तरडेंनी ताराराणींच्या आईचं चित्रपटात नाव ‘लक्ष्मीबाई’ असं दिलं. हा सिनेमा येत्या २७ मे रोजी प्रदर्शित होईल.