Join us

हॅण्डसम डायरेक्टर्स!

By admin | Published: June 23, 2017 1:41 AM

शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, रणबीर कपूर, रणवीरसिंह बॉलिवूडमध्ये असे अनेक हॅण्डसम अ‍ॅक्टर्स आहेत. पण, या गुड लुकिंग सेलिब्रिटीजची यादी इथेच संपत नाहीत.

शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, रणबीर कपूर, रणवीरसिंह बॉलिवूडमध्ये असे अनेक हॅण्डसम अ‍ॅक्टर्स आहेत. पण, या गुड लुकिंग सेलिब्रिटीजची यादी इथेच संपत नाहीत. या यादीत कॅमेऱ्यामागे आपल्या कलेचे दर्शन घडवणाऱ्या सेलिब्रिटींचाही समावेश करावाच लागेल. होय, हे सेलिब्रिटी म्हणजे बॉलिवूडचे हॅण्डसम डायरेक्टर्स. कदाचित तुम्ही फार लक्ष दिले नसेल; पण बॉलिवूडचे अनेक दिग्दर्शकही कमालीचे हॅण्डसम आहेत. अशाच काही हॅण्डसम डायरेक्टर्सबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...इम्तियाझ अलीकुरळे लांब केस, पुरेशी उंची, गुड लुकिंग पर्सनॅलिटी असे परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला इम्तियाझ अली हा बॉलिवूडचा एक हॅण्डसम डायरेक्टर. ४६ वर्षांचा इम्तियाझ आजही बराच यंग आणि हॅण्डसम दिसतो. इम्तियाझच्या क्यूट स्माईलचेही अनेक ‘दिवाने’ आहेत. इम्तियाझचा ‘जब हॅरी मेट सेजल’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा ही जोडी दिसणार आहे.अयान मुखर्जीअयान मुखर्जी हाही बॉलिवूडचा एक गुड लुकिंग डायरेक्टर. रणबीर कपूरचा सर्वाधिक जवळचा मित्र असलेल्या अयानने ‘वेक अप सिड’, ‘ये जवानी है दिवानी’ असे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अयान प्रचंड फिट आणि हॅण्डसम दिग्दर्शक आहे.बिजॉय नंबियार‘शैतान’ आणि ‘वजीर’ सारखे चित्रपट दिग्दर्शित करणारा बिजॉय नंबियारही हॅण्डसम डायरेक्टर्सच्या यादीत सामील आहे. बोलके डोळे असलेल्या बिजॉय बिअर्ड लुकमध्ये चांगलाच हॅण्डसम दिसतो.अभिषेक कपूरदिग्दर्शक अभिषेक कपूर आज ४५ वर्षांचा आहे; पण या वयातही तो एकदम फिट आहे. वेल बिल्ड बॉडी आणि बिअर्ड लुकमधील अभिषेकचा हॅण्डसम डायरेक्टर्सच्या यादीत समावेश करावाच लागेल. अभिषेकने आपल्या करिअरची सुरुवात अभिनेता म्हणून केली होती. ‘उफ्फ ये मोहब्बत’ मध्ये तो टिवंकल खन्नासोबत दिसला होता; पण तो चित्रपट बॉक्स आॅफिसवर दणकून आपटला. यानंतर २००६ मध्ये अभिषेकने ‘आर्यन’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले. ‘रॉक आॅन’ व ‘काय पो चे’ असे अनेक हिट सिनेमे त्याने दिले आहेत.पुनीत मल्होत्रापुनीत हा बॉलिवूडचा हॅण्डसम डायरेक्टर. करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’ चित्रपटात पुनीत अस्टिस्टंट डायरेक्टर होता. यानंतर ‘हेट लव्ह स्टोरी’ या चित्रपटाद्वारे त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवले.रोहित शेट्टीरोहित शेट्टी हाही बॉलिवूडचा हॅण्डसम डायरेक्टर. टीव्हीवर आपण रोहितला पाहिले आहे; पण रोहितने मनात आणले असते तर तो अगदी सहज मोठ्या पडद्यावर हिरो म्हणून झळकला असता. रोहितचे वडील हिंदी व कन्नड चित्रपटातील विख्यात फाईट मास्टर होते. १७ वर्षांच्या वयात ‘फूल और काँटे’ मधून त्याने सहायक दिग्दर्शक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती.कबीर खानकबीर खान हा बॉलिवूडचा टॉपचा डायरेक्टर. कबीरचे अनेक चित्रपट तुम्ही पाहिले असतील; पण कबीर त्याच्या चित्रपटाइतकाच सुंदरही आहे. हॅण्डसम डायरेक्टर्सच्या यादीत त्यामुळे कबीर खान नसेल तर नवलच. लवकरच कबीर खान ‘ट्यूबलाईट’ हा सिनेमा रिलीज होतो आहे. यात सलमान खान लीड रोलमध्ये आहे.