Join us

मुंबईतल्या पाण्यामुळे हंसल मेहतांना पोटदुखीचा आजार, सरकारवर टीका करत म्हणाले, "दोन उपमुख्यमंत्री असूनही..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 18:21 IST

"दोन उपमुख्यमंत्री असूनही...", मुंबईच्या पाण्यामुळे झालेल्या पोटदुखीच्या आजारानंतर प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शकाची सरकारवर टीका

हंसल मेहता हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. 'फराझ', 'सिटी लाइट्स', 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर', 'कॅप्टन इंडिया' यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. हंसल मेहता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेकदा ते घडामोडींवर परख़पणे मत व्यक्त करताना दिसतात. त्यांनी केलेल्या अशाच एका ट्वीटची चर्चा रंगली आहे. 

हंसल मेहता पोटदुखीमुळे त्रस्त आहेत. पिण्याच्या पाण्यामुळे इन्फेक्शन झाल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यासंबंधी ट्वीट करत हंसल मेहता यांनी राज्यसरकारवर टीका केली आहे. "माझ्या पोटात इन्फेक्शन झालं आहे. यासाठी मी माझ्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घेतला. अशी लक्षणं असलेले रोज किमान १० रुग्ण तरी माझ्याकडे येत आहेत. काहींना रुग्णालयात भरतीही व्हावं लागलं आहे, असं ते मला म्हणाले. पिण्याच्या पाण्यामुळे इन्फेक्शन झाल्याचं त्यांनी सांगितलं," असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

"सुरुवात चांगली झाली...", Chandrayaan-3च्या यशस्वी उड्डाणानंतर हेमंत ढोमेने केलेलं ट्वीट चर्चेत

'बाईपण भारी देवा' बॉक्स ऑफिसवर सुसाट! केदार शिंदेंच्या चित्रपटाने १४ दिवसांत कमावले 'इतके' कोटी

"देशाची आर्थिक राजधानी आणि दोन मुख्यमंत्री असूनही राज्याची राजधानी असलेल्या शहराला स्वच्छ आणि शुद्ध पाण्याचा पुरवठा होत नाही. रस्त्यांची वाईट अवस्था, ट्राफिक, ठिकठिकाणी साचणारं पाणं आणि पायाभूत सुविधांचा अभाव...ही मुंबई आहे. नागरिकांचा विचार न करणाऱ्या राजकरण्यांकडून ही मुंबई चालवली जाते. त्यांना फक्त सत्ता हवी आहे. आणि स्वत:ची तिजोरी भरायची आहे," असं पुढे हंसल मेहतांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, उद्धव ठाकरे व मुंबई महानगरपालिकेच्या  ट्वीटर अकाऊंटना टॅग केलं आहे. हंसल मेहता यांच्या या ट्वीटची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. त्यांच्या या ट्वीटवर अनेकांनी रिप्लाय दिला आहे. काहींनी त्यांना ट्रोलही केलं आहे. 

टॅग्स :बॉलिवूडहंसल मेहताएकनाथ शिंदेमुंबई