Join us

हॅपी बर्थ डे ऐश्वर्या...

By admin | Published: November 01, 2016 12:00 AM

रॉयल फॅमिली : बच्चन कुटूंब बॉलीवूडमधील रॉयल फॅमिली म्हणून ओळखले जाते. शहेनशाह अमिताभ बच्चन जया बच्चन अभिषेक बच्चन आणि ...

रॉयल फॅमिली : बच्चन कुटूंब बॉलीवूडमधील रॉयल फॅमिली म्हणून ओळखले जाते. शहेनशाह अमिताभ बच्चन जया बच्चन अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय-बच्चन फिल्म इंडस्ट्रीतील सर्वात पॉवरफूल आणि लोकप्रिय कलाकार आहेत.

कान्स क्वीन : जागतिक चित्रपट महोत्सव ‘कान्स’मध्ये भारताचे सर्वाधिक वेळा प्रतिनिधित्व ऐश्वर्यानेच केले आहे. कान्स रेड कार्पेटवरील तिच्या सौंदर्याची चर्चा केवळ भारतातच नाही तर विदेशी मीडियामध्येसुद्धा खूप असते.

मस्ती विथ फ्रेंडस : मैत्रिणींसोबत चीनच्या भींतीवर काढलेला हा फोटो नक्कीच ऐश्वर्याच्या वैयक्तिक जीवनातील एका महत्त्वाच्या क्षणाचा साक्षीदार आहे.

बेबी प्रिन्सेस : आराध्या म्हणजे ऐश्वर्याचा जीव की प्राण. ती जाईल तेथे आपल्या मुलीला सोबत घेऊन जाते.

डिअर हबी : ऐश्वर्या आणि अभिषेक बॉलीवूडमधील सर्वात चर्चिले जाणारे कपल आहे.

गॉसिप गर्ल्स : कान्स फेस्टिव्हलमध्ये ‘गॉसिप गर्ल’ टीव्ही सिरीज फेम लाईव्हली ब्लेकसोबत काढलेला हा फोटो प्रचंड लोकप्रिय झाला होता.

मिस वर्ल्ड : १९९४ साली ‘मिस वर्ल्ड’चा खिताब पटकावल्यानंतर झालेला आनंद काय असेल ते वेगळे काही सांगायला नको. हा मुकूट घातलेला फोटो चाहत्यांच्या आठवणींमध्ये नेहमीसाठी कोरला गेलेला आहे.

बच्चन फॅमिलीची सून आणि एक उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ऐश्वर्याने जे स्थान मिळवले आहे ते पाहून कोणालाही तिचा हेवा वाटेल. नैसर्गिक सौंदर्याचे उजळ वरदान लाभलेली ही लावण्यवती सोशल मीडियापासून मात्र थोडी फटकूनच राहते.

ऐ दिल... : वयाच्या ४३ व्या वर्षीदेखील एवढं ग्लॅमरस दिसणं केवळ अॅशलाच जमू शकतं. आजच्या अभिनेत्रींनाही ज्युनिअर वाटावी असे तिचे रुप. ‘ऐ दिल है मुश्किल’मधील तिचा लूक आतापर्यंतचा सर्वात सुंदर मानला जात आहे.

वयाच्या चाळीशीनंतर जेथे कित्येक अभिनेत्रींचे करिअर संपलेले असते तेथे ऐश्वर्या आजही एकाहून एक सरस चित्रपटांत काम करत आहे. आजही ती लीडिंग लेडी म्हणून दिग्दर्शकांची पहिली पसंती असते. लग्न आणि आई झाल्यावरही या ‘मिस वर्ल्ड’चे करिअर जोमात आहे.

सौंदर्य नृत्य दिलखेचक अदा आणि तितकाच दमदार अभिनय या सर्वांचे मिश्रण म्हणजे बॉलिवूडची सौंदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्या राय- बच्चन. चित्रपटसृष्टीक अॅश या टोपणनावाने ओळखल्या जाणा-या ऐश्वर्याचा आज ४३ वाढदिवस... त्यानिमित्त आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत तिचे काही खास फोटोज..