Join us

unknown facts! माजी गृहमंत्र्यांची लेक आहे भूमी पेडणेकर; आईदेखील आहे ज्येष्ठ समाजसेविका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2022 3:52 PM

Bhumi pednekar: अभिनयामुळे चर्चेत येणाऱ्या भूमीचे वडील मोठे राजकीय व्यकी होते. इतकंच नाही तर तिची आईदेखील सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री म्हणून भूमी पेडणेकरकडे (Bumhi Pednekar)  पाहिलं जातं. उत्तम अभिनयासह भूमी कायम तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी चर्चेत येत असते. समाजात घडणाऱ्या कोणत्याही घटनेवर भूमी उघडपणे व्यक्त होते. त्यामुळे वरचेवर ती नेटकऱ्यांमध्ये चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर

अभिनेत्रीच्या कुटुंबाची चर्चा रंगली आहे. भूमीचे वडील प्रसिद्ध राजकीय व्यक्ती असल्याचं समोर आलं आहे.१८ जुलै १९८९ मध्ये मुंबईत भूमीचा जन्म झाला. त्यामुळे आज भूमी तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. या वाढदिवसानिमित्त तिच्याविषयीचे अनेक unknow fact समोर येत आहेत. अभिनयामुळे चर्चेत येणाऱ्या भूमीचे वडील मोठे राजकीय व्यकी होते. इतकंच नाही तर तिची आईदेखील सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

कोण आहेत भूमीचे वडील?

भूमी पेडणेकर ही महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि कामगार मंत्री सतीश पेडणेकर यांची लेक आहे. तर, भूमीची आई सुमित्रा हुडा पेडणेकर या तंबाखूविरोधी कार्यकर्त्या आहेत. सतीश पेडणेकर यांना तोंडाचा कर्करोग झाल्यामुळे त्यांचं निधन झालं. मात्र, त्याचं कार्य आजही जनतेच्या लक्षात आहे. मात्र, भूमी आणि सतीश पेडणेकर या बाप-लेकीच्या नात्याविषयी फार मोजक्या जणांना माहित आहे.

टॅग्स :भूमी पेडणेकर सेलिब्रिटीबॉलिवूड